Skymet weather

[Marathi] मुंबईत गरमी, तापमान सामन्यपेक्षा 2-3 अंशांनी अधिक

October 16, 2018 6:46 PM |

website

राज्यातील वाढलेल्या तापमानावरून असे दिसून येते की आगामी उत्सवांच्या काळात नागरिकांची उष्णतेपासून सुटका निश्चितच नाही. विदर्भासह, कोकण आणि गोव्यातील तापमान 2 अंशांनी वाढले आहे, तर मुंबईमध्ये देखील पारा 35 ते 37 अंशांपर्यंत वाढला आहे.

पूर्व आणि पूर्वोत्तर दिशेने राज्यात येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे दिवसा तापमान ३० अंशांच्या पलीकडेच स्थिरावणार असे दिसत आहे ज्यामुळे वातावरणात अस्वस्थता निश्चितच अपेक्षित आहे.

दरम्यान समुद्र किनाऱ्याच्या सानिध्यात असलेल्या ठाणे, डहाणू आणि मुंबईत हळूहळू वाढणाऱ्या तापमानासह आर्द्रतेमुळे रहिवाशांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागेल.

तथापि, १८ ऑक्टोबर च्या आसपास कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्यामुळे कोकण आणि गोव्यासह, मध्य-महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका पाऊस होवून उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try