[Marathi] मुंबई आणि डहाणू भागात शुष्क आणि दमट हवामान,फळबागांमध्ये किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

February 16, 2018 6:54 PM|

Rains in Mumbai, Pune to make an appearance soon

महाराष्ट्रात सध्या कोरडे आणि उबदार हवामान आहे. मागील ४८ तासांत मराठवाडा आणि  विदर्भाच्या भागात  पावसाच्या सरी कोसळल्या, पण कोंकण आणि  गोव्यात मात्र वातावरण कोरडे राहिले.

सततच्या शुष्क वातावरणामुळे कोंकण आणि गोव्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली. मागील ४८ तासांत कमाल आणि  किमान तापमानात वाढ  झाल्याचे निदर्शनास  आले. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस च्या जवळपास पोहचले.

मागील २४ तासांत, डहाणू येथील कमाल तापमानात ७ अंशाने वाढ झाली, मुंबई आणि रत्नागिरी इथे कमाल तापमान ५ अंशाने वाढले. तर वेंगुर्ला  येथील दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या  तुलनेत  ४ अंशाने वाढले.

[yuzo_related]

स्काय  मेट वेदर  च्या हवामान अंदाजानुसार, तापमानात वाढ  होण्याचे कारण  पूर्वेकडून येणारे जमिनी  वारे आहे.  हे वारे साधारणतः  गरम असतात ज्यामुळे तापमानात  वाढ झाली आहे. सुरुवातीस  ईशान्य आणि उत्तरेकडून येणाऱ्या  थंड वाऱ्यांमुळे तापमान सरासरीच्या खाली होते. सद्यस्थितीत, कोंकण आणि गोव्याच्या  हवामानात फारसा बदल संभवत नाही, पण दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ  होण्याची शक्यता आहे.

Maharashtra

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

१९ आणि २० फेब्रुवारीला तापमानात किंचितशी  घट  संभवते, त्यानंतर मात्र तापमानात वाढ होईल. त्यामुळे कोंकणच्या  किनारी भागात गर्मी आणि

आर्द्रता वाढेल, तर कोकणाच्या आंतर भागात हवामान शुष्क आणि निरभ्र  राहील.

शेतीची करावयाची कामे

तापमानात होणारे चढ-उतार आणि ढगाळ वातावारणामुळे वाढलेली आर्द्रता  ह्यामुळे आंबा आणि काजू च्या बागेत  फुलगळ आणि फळगळ सोबतच रोगाचा प्रादुर्भाव  होण्याची शक्यता आहे ज्यामुळे शेतकरी  बांधवानी  दक्ष  राहावे.  उन्हाळी  पिकास गरजेनुसार पाणी द्यावे.

ImageCredit:  Wikipedia          

Any information taken from here should be credited to skymetweather.com

author image