स्कायमेटच्या अंदाजानुसार आगामी मॉन्सूनचा हंगाम 'सामान्य' राहण्याची अपेक्षा आहे. येत्या हंगामात वार्षिक सरासरीच्या तुलनेत मॉन्सूनचा पाऊस जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत१०० टक्के (+/- ५% च्या त्रुटीसह) राहण्याची शक्यता आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, मॉन्सूनचे संभावित वितरण
• ५% शक्यता जास्त पावसाची (हंगामी पाऊस ११०% पेक्षा जास्त आहे)
• २०% शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची (हंगामी पर्जन्य १०५% ते ११०% च्या दरम्यान)
• ५५% शक्यता सर्वसाधारण पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्यमान ९६ ते १०४% च्या दरम्यान)
• २०% शक्यता सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्य ९०% ते ९५% च्या दरम्यान)
• ०% शक्यता दुष्काळ होण्याची (हंगामी पाऊस ९०% पेक्षा कमी)
पावसाचे मासिक वितरण
जून - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १११% (जूनसाठी दीर्घकालीन सरासरी = १६४ मिमी)
• सामान्य पावसाची ३०% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची ६०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची १०% शक्यता
जुलै - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९७% (जुलैसाठी दीर्घकालीन सरासरी = २८९ मिमी)
• सामान्य पावसाची ५५% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १५% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३०% शक्यता
ऑगस्ट- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९६% (ऑगस्ट साठी दीर्घकालीन सरासरी = २६१ मिमी)
• सामान्य पावसाची ५५% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३५% शक्यता
सप्टेंबर- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०१% (सप्टेंबर साठी दीर्घकालीन सरासरी = १७३ मिमी)
• सामान्य पावसाची ६०% शक्यता
• सामान्यपेक्षा जास्त पावसाची २०% शक्यता
• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची २०% शक्यता
स्काइमेटचा मॉन्सून अंदाज अहवाल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Image credit: Wikipedia