Skymet weather

[Marathi] कोकणात मध्यम सरी तर मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस

August 17, 2019 9:10 AM |
Maharashtra rains

मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातून काढता पाय घेतला असून आता राज्यात केवळ हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात तसेच विदर्भात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी हवामानाचा अंदाज पाहूयात.

कोकण आणि गोवा: उत्तर भागावर पावसात लक्षणीय घट झाली असून मुंबई आणि आसपासच्या भागात हलक्या सरींची नोंद झाली. तथापि दक्षिण कोकणात काही प्रमाणात जोरदार सरी बरसल्या आहेत. गुरुवारी सकाळी साडेआठपासून २४ तासांच्या कालावधीत महाबळेश्वरमध्ये ४४ मिमी, वेंगुर्ला २५ मिमी, हर्णेत १२ मिमी आणि रत्नागिरीमध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली.

दक्षिण-कोकणात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील, तर उत्तर कोकणात हलका पाऊस पडेल. पुढील ४८ तासात मुंबईला हलक्या सरींवर समाधान मानावे लागेल. त्यानंतर, पाऊस काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे परंतु केवळ मध्यम सरी पडण्याची अपेक्षा आहे.

विदर्भ: गेल्या २४ तासात काही प्रमाणात मध्यम पाऊस पडल्यानंतर पावसाचा जोर आता कमी होईल परंतु वातावरणात ओलावा असल्याने विदर्भात तुरळक सरी पडत राहतील. यासह, पारा पुन्हा वाढू लागेल ज्यामुळे दमट आणि उबदार वातावरण
परतेल.

मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाडा: पावसाअभावी हवामान उबदार व दमट राहील.कोल्हापूर आणि सांगली या पूरग्रस्त शहरांमध्ये पावसात लक्षणीय घट झाली आहे. फक्त विखुरलेला पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. हा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची अपेक्षा असून बहुधा दिवसाच्या उत्तरार्धातच होईल.

Image Credits – India Today

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try