Skymet weather

MD Skymet, Jatin Singh: भारतातील बर्‍याच भागासाठी विक्रमी जानेवारी आणि दक्षिण भारतात उन्हाळ्यास सुरुवात होण्याचा इशारा

February 3, 2020 1:44 PM |

MD blog

मागील आठवड्याचा आढावा (२४ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२०)

जानेवारी महिना हा २००५ नंतरचा सर्वाधिक पावसाचा महिना म्हणून संपुष्टात आला. संपूर्ण देशात सरासरीपेक्षा ६३% पाऊस झाला, वायव्य भारतात ७०% जास्त, मध्य भारतात ८४%, पूर्व आणि ईशान्य भारतात ५१% जास्त पाऊस झाला दुसरीकडे मात्र दक्षिण भारतात २१% तूट राहिली. दिल्ली आणि कोलकाता येथे पावसाने जानेवारीचा मासिक पावसाचा आकडा ओलांडला आहे. उत्तरेकडील मैदानी भाग आणि पूर्व भारतभर पावसाची कामगिरी कृषी दृष्टिकोनातून खूप चांगली राहिली. उत्तराखंडमध्ये विक्रमी म्हणजेच सरासरीच्या तब्बल २३५% बर्फवृष्टीची नोंद झाली असून, अन्य डोंगराळ भागांत देखील तुलनेने जास्त बर्फवृष्टी झाली आहे.

उत्तर भारत

या आठवड्यात हवामान विषयक गतिविधी उत्तरेकडून पूर्वेकडील भागांकडे सरकल्या आहेत, तर दोन हवामान प्रणालींमुळे डोंगररांगांमध्ये ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल याउलट पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआर यांचा समावेश असलेल्या उत्तरेकडील मैदानावर कोणत्याही लक्षणीय गतिविधींची अपेक्षा नाही. उत्तर भारतामध्ये पहाटेस थंडी व धुके असेल आणि काही ठिकाणी दाट धुके व एक अंकी किमान तापमान नोंदवले जाईल.

मध्य भारत

आठवड्याच्या उत्तरार्धात गुजरात राज्यात चांगल्या हवामानासह तापमानात किंचित घट होईल. पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि ओडिशासारख्या भागांमध्ये गडगडाटासह अवकाळी पावसाची अपेक्षा असून ७ व ८ तारखेस जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि ईशान्य भारत

झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात ४ व ५ फेब्रुवारीस आणि दुसऱ्या टप्प्यात ६, ७ व ८ रोजी अधिक तीव्रतेचा पाऊस होईल. ईशान्य भारतात, हवामान गतिविधी आठवड्यातील शेवटचे दोन दिवस ८ व ९ तारीख वगळता अरुणाचल प्रदेशापुरत्याच मर्यादित राहतील आठवड्याच्या शेवटी पावसाळी गतिविधी दक्षिण आसाम, मिझोरम आणि त्रिपुरा या इतर भागात पोहोचतील.

दक्षिण भारत

सामान्यतः दक्षिणी द्वीपकल्पात कोणत्याही प्रकारच्या हवामान गतिविधींची शक्यता नाही. तथापि, तामिळनाडूमध्ये किनारपट्टीवरील भागांत विशेष म्हणजे ८ व ९ तारखेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण भारतात असे दिसून आले आहे की तापमानात अकाली वाढ नोंदविली जात आहे, जे उन्हाळ्याचे लवकर आगमन होण्याचे सूचित करीत आहे.

दिल्ली

दिल्लीकरांसाठी साधारणपणे रात्री थंडगार व धुके व दुपार उबदार राहण्याची अपेक्षा आहे.

चेन्नई

चेन्नईकरांसाठी आठवड्याचे शेवटचे दोन दिवस सोडले तर साधारणतः दुपारी उबदार व दमट आणि रात्र आल्हाददायक वातावरण राहील. आठवड्याच्या शेवटी ८ व ९ रोजी ढगाळ आकाश व हलका पाऊस अपेक्षित आहे.

Image Credits – The Shillong Times

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try