गेल्या आठवड्यात, मर्यादित हवामान गतिविधींसह, उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात हवामान प्रामुख्याने कोरडे होते. मैदानी भागांतील रात्री व दिवसाचे वाढते तापमान हे या प्रदेशातील हिवाळ्याचा हंगाम संपुष्टात येत असल्याची पूर्वसूचना देत आहेत. तसेच, पश्चिम किनाऱ्यावरील विशेषत: केरळ आणि कर्नाटकमध्ये, वाढते तापमान आगामी उन्हाळ्याचे सूचक आहेत. आपण लवकरच उन्हाळ्याचा हंगाम सुरु होण्याची अपेक्षा केली पाहिजे. मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा मुख्यतः उत्तरार्धात थोडा अधिक सक्रिय असेल.
उत्तर भारत
कमकुवत पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव १८ तारखेपासून २३ तारखेपर्यंत डोंगररांगांवरील हवामानावर होईल, या डोंगराळ भागांमध्ये या काळात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील मैदानी भागांत गेलेल्या आठवड्या प्रमाणेच हा आठवडा देखील लक्षणीय गतिविधींपासून मुक्त राहील. उत्तर राजस्थान, हरियाणा, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेश येथे काही ठिकाणी २० ते २३ दरम्यान गडगडाटासह पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान २१ तारखेस पूर्व उत्तरप्रदेशात तीव्र गतिविधींसह गारपीटीची अपेक्षा केली जाऊ शकते.
आता फेब्रुवारीच्या उत्तरार्धात तापमानात वाढ दिसून येईल आणि हे वैशिष्ट्य हिवाळ्याचा हंगाम संपुष्टात येण्याचे आणि उन्हाळ्याच्या हंगामाकडे संक्रमण होत असल्याचे निर्देशक आहे.
मध्य भारत
मध्यभारतात प्रामुख्याने आल्हाददायक हवामानाची स्थिती कायम राहील. गुजरात आणि महाराष्ट्रातील बर्याच भागांत उबदार आठवडा अपेक्षित आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात पूर्व मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये काही अवकाळी गतिविधींची अपेक्षा आहे. तसेच ह्या गतिविधींच्या पार्श्वभुमीवर २३ तारखेला विदर्भाच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील आहे.
पूर्व आणि ईशान्य भारत
जवळजवळ संपूर्ण आठवड्यात हवामान विषयक गतिविधी अरुणाचल प्रदेश पुरत्या मर्यादित राहतील. बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसह ईशान्य भारतातील उर्वरित भागांमध्ये आठवड्याच्या उत्तरार्धात २० ते २३ तारखे दरम्यान हलक्या सरी आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान २३ तारखेला ह्या गतिविधी अधिक तीव्र आणि व्यापक असू शकतात.
दक्षिण द्वीपकल्प
केरळ आणि कर्नाटकमधील तापमानात होणारी वाढ ही देशात होणाऱ्या उन्हाळ्याच्या आगमनाकडे निर्देश करत आहे. दरम्यान २१ तारखेला तामिळनाडूमध्ये गडगडाटासह पावसाळी गतिविधींची शक्यता आहे. त्यानंतर राज्यभर हलका पाऊस होण्याची अपेक्षा असून गतिविधी २२ तारखेच्या सुमारास दक्षिणेकडील टोकापुरत्या मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
दिल्ली
गेल्या आठवड्यात राजधानीत तापमानात वाढ दिसून आली असून १३ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान २७.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. शहरात ७५ दिवसांच्या अंतरानंतर प्रथमच तापमान २५ अंशाच्या वर गेले, किमान तापमान सर्वसामान्यांपेक्षा ३-५ अंशांपर्यंत अधिक नोंदविले गेले, जे असामान्य आहे. राजधानी फेब्रुवारीच्या उर्वरित दिवसांमध्ये वारंवार किमान तापमान दोन अंकी जाईल. तसेच २० ते २३ दरम्यान शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चेन्नई
उबदार व दमट हवामानासह कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत राहील आणि किमान तापमान २१-२२ अंशांच्या आसपास राहील. दरम्यान २१ रोजी शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शहरात येत्या काही दिवसांत अशा प्रकारच्या गतिविधींची अपेक्षा आहे.
Image Credits – Wikipedia
Any information taken from here should be credited to Skymet Weather