जानेवारी महिन्यात चांगला पाऊस अनुभवण्यात आला. या पावसाचा जोर प्रामुख्याने ईशान्य आणि मध्य भारतामध्ये अधिक होता. तथापि, उत्तर आणि पूर्व भागातील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात तुलनेने सौम्य पावसाने झाली. पावसाळी पट्टा मध्य भारतासह तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशकडे सरकला आहे.
येत्या १० ते १६ फेब्रुवारी दरम्यानच्या आठवड्यात हवामान विषयक गतिविधी मुख्यत्वे उत्तरेकडील आणि अरुणाचल प्रदेशच्या ईशान्येकडील टेकड्यांपुरत्या मर्यादित राहणार आहेत.
उत्तर भारत
नव्याने येणाऱ्या पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव ११ फेब्रुवारीपासून हिमालयाच्या पश्चिम भागांवर होण्यास सुरवात होईल व १४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. या काळात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागांत व्यापक पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान गतिविधींचा जोर १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी वाढेल व १५ फेब्रुवारीपर्यंत हवामान प्रणाली या भागांपासून दूर जाईल.
तथापि, वायव्येकडील मैदानी भागांत कोणतीही लक्षणीय हवामान विषयक गतिविधी नसेल. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पहाटे थंडी व धुके आणि सोबतीला दिवसा पुरेसा सूर्यप्रकाश जोराचा वारा ह्या प्रमुख हवामान गतिविधी ठरणार आहे.
पूर्व आणि ईशान्य भारत
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचा समावेश असलेल्या पूर्व भारतात हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहील. संपूर्ण प्रदेशात दिवसा जोरदार वारा व सूर्यप्रकाश अपेक्षित आहेत.
ईशान्य भारतात या आठवड्यात तुलनेने किमान हवामान गतिविधींची अपेक्षा असून केवळ १५ आणि १६ फेब्रुवारीला फक्त अरुणाचल प्रदेशात आठवड्याच्या शेवटी काही प्रमाणात विखुरलेला पाऊस आणि गडगडाटी परिस्थिती अनुभवली जावू शकते.
मध्य भारत
मागील आठवड्यात या प्रदेशात विशेषत: छत्तीसगड आणि ओडिशामध्ये गडगडाटासह व्यापक पाऊस आणि गारपीट झाली. याउलट, संपूर्ण प्रदेश, या आठवड्यात अवकाळी हवामान गतिविधींपासून मुक्त राहण्याची शक्यता आहे.
दक्षिण द्वीपकल्प
काही ठिकाणी १० आणि ११ फेब्रुवारीच्या आसपास तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित दिवस मात्र कोरड्या हवामानाची परिस्थिती राहील. या प्रदेशात वाढणारे तापमान हे नियोजित वेळे आधीच उन्हाळ्याच्या लवकर येण्याचे संकेत आहेत.
दिल्ली एनसीआर
दिल्लीकरांनी ऊन व जोरदार वारा असेलेल्या दिवसांची अपेक्षा करावी, तर पहाटे आणि रात्री थंडी असेल. दिल्लीत पहाटेस हलके धुके राहण्याची अपेक्षा आहे. आठवड्याच्या अखेरीस किमान तापमान एक अंकी वरून वाढून दोन-अंकी होण्याची शक्यता आहे.
चेन्नई
चेन्नईत येत्या आठवड्यात कोरड्या हवामानासह आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपार उबदार व दमट राहील तर कमाल तापमान ३० अंशांच्या आणि किमान तापमान २० अंशांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे.
Image Credits – Woodstock
Any information taken from here should be credited to Skymet Weather