Skymet weather

MD Skymet, Jatin Singh:उत्तर भारतात लक्षणीय हवामान विषयक गतिविधी, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये हलका पाऊस, दक्षिण भारतात कुठलीही लक्षणीय हवामान गतिविधी नाही, दिल्ली एनसीआर मध्ये पावसाची शक्यता

January 14, 2020 11:02 AM |

MP rains

मागील आठवड्यात भारताच्या चारही विभागांत अतिरिक्त पाऊस झाला. नवीन वर्षाच्या पहिल्या काही दिवसांत देशभरात मुसळधार पाऊस अनुभण्यात आला. उत्तर भारतात दीर्घकाळ पावसाळी गतिविधींमुळे विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळा निर्माण झाला. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली, तर विदर्भ, पूर्व मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचा अनुभव आला. याउलट पावसाची कमतरता कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागापुरती मर्यादित होती.

उत्तरेकडील मैदानी भागांत पाऊस, उत्तरी डोंगररांगांत बर्फवृष्टी, ईशान्य भारतात लक्षणीय हवामान विषयक गतिविधीचा अभाव

नुकताच आलेला नवा पश्चिमी विक्षोभ उत्तरेकडील मैदानी भागांत पाऊस पाडेल आणि डोंगरारांगांत देखील हिमवृष्टी होईल. १३ आणि १६ तारखेला हवामान गतिविधींचा जोर वाढेल ज्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होतील. तुलनेने सौम्य गतिविधी १४, १५, १८ आणि १९ रोजी अनुभवल्या जातील. यामुळे पंजाब, हरियाणा आणि दिल्ली एनसीआरमध्ये दिवसा देखील थंडीची परिस्थिती निर्माण होईल. या गतिविधींच्या पार्श्वभूमीवर १८ तारखेनंतर उत्तरेकडील मैदानावर थंडीची लाट येईल.

आठवड्याच्या पूर्वार्धात पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामान स्वच्छ राहील आणि रात्रीच्या तपमानात किंचित घट दिसून येईल. आठवड्याच्या उत्तरार्धात बिहारमध्ये हलका पाऊस पडेल. दरम्यान या आठवड्यात या भागात कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामान गतिविधींची नोंद होण्याची अपेक्षा नाही.

गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात १३ जानेवारीला हलका पाऊस पडेल. त्यानंतर, आठवडाभर आकाश निरभ्र असेल. या आठवड्यात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवकाळी पावसाळी गतिविधी थांबतील. आठवड्याच्या उत्तरार्धात रात्रीच्या तापमानात किंचित घट नोंदविली जाईल.

दिल्ली एनसीआरला पावसाळी गतिविधी १३ ते १७ जानेवारी दरम्यान दिल्लीत वेगवेगळ्या तीव्रतेच्या पावसाळी गतिविधी अनुभवल्या जातील. पावसाळी गतिविधींचा जोर १३, १६ आणि १७ जानेवारी रोजी वाढेल, तर १४ आणि १५ तारखेला गतिविधी कमकुवत असतील. दरम्यान १७ तारखेनंतर दिल्ली एनसीआरमध्ये थंडीची लाट अनुभण्यात येईल.

Image Credits – The Live Nagpur 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try