Skymet weather

MD Skymet, Jatin Singh: नवीन पश्चिमी विक्षोभाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात फेब्रुवारी महिन्याचा शेवट पावसाळी गतिविधींनी होणार, दक्षिण भारतात मान्सूनपूर्व सरी

February 25, 2020 11:16 AM |

MD blog

पावसाच्या बाबतीत सांगायचे तर जानेवारी महिना सर्वाधिक पावसाचा राहिला असून पावसाचा अधिशेष ६३ टक्के इतका होता. जानेवारीच्या तुलनेत, फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवडा खराब होता. दरम्यान तिसरा आठवडा तुलनेने चांगला राहिला ज्यामुळे हंगामातील एकूण पाऊस -३% राहिला आहे. गेल्या आठवड्यातही अनेक ठिकाणी उष्णतेत वाढ झाली होती. केरळ राज्य अनेक दिवसांपासून बर्‍याच ठिकाणी तापमान ३७ अंशांवर होते. हे वेळेपूर्वीच दक्षिण द्वीपकल्पात उन्हाळ्याचे आगमन झाल्याची घोषणाच करत आहे.

उत्तरेकडील मैदानी प्रदेशात उन्हाळ्याचे आगमान झाल्याचे दर्शविणारा पश्चिम राजस्थान हा पहिला प्रांत असतो जिथे पारा ३५ अंश सेंटीग्रेड पार करतो. गेल्या आठवड्यात मुंबईतही ३८ अंश तापमानामुळे अति गरम हवामान होते जे सामान्यपेक्षा ८ अंशांनी अधिक होते आणि त्यामुळे उष्णतेच्या लाटेची परिस्थिती होती. दरम्यान राजधानी दिल्लीत २० फेब्रुवारीला पावसामुळे जवळपास कोरडेच राहिलेले हवामान थोडे आल्हाददायक झाले. तसेच मान्सूनपूर्व हंगामाची घोषणा करण्यासाठी तामिळनाडूच्या बर्‍याच भागात २१ तारखेला सरी बरसल्या.

उत्तर भारत

उत्तर भारतातील मैदानी भागांवर आणि डोंगररांगांमध्ये आठवड्याची सुरुवात कोरड्या वातावरणाने होणार, तर रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घट अपेक्षित असून परिणामी रात्र थंड पण दिवस मात्र उबदार राहतील. येत्या २७ तारखेला पश्चिमी विक्षोभाच्या आगमनाची अपेक्षा असून त्यामुळे डोंगररांगा प्रभावित होतील आणि नंतर २८ फेब्रुवारी ते १ मार्च च्या दरम्यान पंजाब, हरयाणा, उत्तर राजस्थान, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश राज्य प्रभावित होतील.

मार्चच्या पहिल्या आठवड्यातही हा पाऊस पडेल, तर जम्मू-काश्मीर आणि लडाखवर मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होईल.

पूर्व आणि ईशान्य भारत

मागील आठवड्यातील पूर्वेकडील बिहार, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल व्यापलेल्या पावसाळी गतिविधी या आठवड्याच्या पूर्वार्धात देखील राहतील. संभाव्य विजांच्या कडकडाटासह मध्यम गडगडाट व जोरदार वारा या प्रदेशात अपेक्षित आहे. तसेच २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि नागालँडवर मेघगर्जनेसह पावसाळी गतिविधींची शक्यता उत्तर-पूर्व भारतात आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात संपूर्ण प्रदेशात सौम्य आणि तुरळक गतिविधी दिसून येतील.

मध्य भारत

गुजरातमध्ये पुन्हा कोरडे वातावरण राहील व तापमान ३५ अंशांपेक्षा जास्त राहील. छत्तीसगड आणि ओडिशा येथे २४ आणि २५ तारखेला काही गारपीट व जोरदार वादळी गतिविधींसह पाऊस पडेल. दरम्यान २६ फेब्रुवारीपासून हवामान स्वच्छ होईल, तथापि, २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेशात काही ठिकाणी अवकाळी मध्यम ते हलक्या पावसाच्या अनुभवासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

दक्षिणी द्वीपकल्प

या आठवड्यात मुख्य म्हणजे किनारपट्टीलगत असलेल्या तामिळनाडूत २४ आणि २५ रोजी हलका पाऊस पडेल आणि नंतर उर्वरित आठवड्यात ह्या पावसाळी गतिविधी केरळकडे सरकत. उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर २९ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी पावसाळी गतिविधींची अपेक्षा आहे.

दिल्ली

आठवड्याच्या पूर्वार्धात पहाटे थंडी आणि दुपारी उबदार वातावरण अनुभवले जाईल. फेब्रुवारीचा शेवट पावसाने होणार असून मार्च महिन्याच्या पहिल्या काही दिवस ह्या गतिविधी कायम राहतील.

चेन्नई

चेन्नईत प्रामुख्याने अंशतः ढगाळ वातावरणासह कमाल तापमान ३० तर किमान तापमान २०अंशांच्या आसपास राहील.

तळटीप: - मार्चच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारतातील मैदानावर आणि डोंगररांगांवर पावसाळी गतिविधी राहण्याची अपेक्षा असून रब्बी पिकांसाठी जे अजून अर्ध्या टप्प्यात आहेत त्यांना वरदान ठरू शकतील.






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try