[MARATHI] भारतात मे महिन्यात चक्रीवादळाची श्यक्यता नाही: स्कायमेटचा अंदाज

May 7, 2015 3:24 PM | Skymet Weather Team

भारतातीयद्वीपकल्पाच्या बाजूचे समुद्र हे चक्रीवादळांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. अरबी महासागरापेक्षा बंगालच्या उपसागरात या चक्रीवादळांची निर्मिती  जरी जास्त होत असली तरी दोन्हीत निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची तीव्रता तेवढीच भयंकर असते.

चक्रीवादळे साधारणपणे वर्षभरात दोन वेळा निर्माण होतात, एक म्हणजे मान्सून पूर्व काळ (एप्रिल आणि मे) दुसरा म्हणजे मान्सूनोत्तर काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर) आणि मधल्या काळात म्हणजेच जून पासून ऑक्टोबर पर्यंत हि चक्रीवादळ थांबतात व भारतात मान्सूनचा पाऊस सुरु होतो. तसेच बऱ्याचवेळा मान्सून सुरु झालेला असला तरी अरबी महासागरात जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हि चक्रीवादळे होत असतात पण मान्सूनचा पाऊस देशात तोपर्यंत पोहचला असेल तर मात्र या वादळांचा होणारा परिणाम हा फारच कमी असतो.

पूर्व मान्सून काळातील चक्रीवादळांचा इतिहास :

सर्वसाधारणपणे वर्षाच्या एप्रिल आणि मे या काळात वादळांचे प्रमाण वाढते हे आपण अनुभवत असतो. असे असले तरीही चक्रीवादळे मात्र दरवर्षी आणि सारख्याच संख्येने होतील हि शक्यता फारच कमी असते.

बंगालच्या उपसागरात गेल्या १० वर्षात  तीनच चक्रीवादळे निर्माण झाली आणि ती म्हणजे माला (२००६), नर्गिस (२००८) आणि बिजली (२०१०). परंतु मे महिन्यात बंगालचा उपसागर व अरबीसमुद्र दोन्हीत चक्रीवादळे निर्माण होतात. मे मध्ये मागील दशकात आयला (२००१), बंदू (२०१०) आणि महासेन (२०१३) या चक्रीवादळांची निर्मिती झाली होती.

बंगालच्या उपसागरातील नर्गिस या वादळाचा परिणाम मे २००८ मध्येही दिसून आला होता. गेल्या दहा वर्षात जून महिन्यात फक्त अरबी महासागरातच चक्रीवादळ निर्माण झालेली दिसून आली या वादळांची नावे पुढीलप्रमाणे गोनू (२००७), फेट (२०१०) आणि नानौक (२०१४).

अरबी महासागरातील गोनू हे आतापर्यंतचे सर्वात मोठ्ठे चक्रीवादळ आहे. २०१० हे वर्ष अपवादात्मक होते कारण त्या वर्षी मान्सून काळात तीन चक्रीवादळे झाली.

यंदा म्हणजे एप्रिल २०१५ ला एकही चक्रीवादळ झालेले नाही. तसेच हवामानाच्या अभ्यासा साठी जे मॉडेल्स वापरले जातात त्या नुसार मे महिन्यातही चक्रीवादळ उत्पत्तीचे एकही लक्षण अद्यापपर्यंत दिसलेलं नाही आणि म्हणूनच या महिन्यात चक्रीवादळ होण्याची शक्यताही कमीच आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अंदमानच्या जवळील सागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हि प्रणाली म्यानमार मधील अराकन जवळ असून तेथील सागरी किनारपट्टीला मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.     

Image Credit: livemint.com

OTHER LATEST STORIES