मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोंकण भागात, मागील २४ तासांत दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. जसे कि फेब्रुवारी महिन्यात मुंबई येथील कमाल तापमान ३७ ते ३८°C नोंदले जात होते, पण मार्च महिन्यात मात्र तापमान घटले. कालचे, सांताक्रूझ येथील वेधशाळेत दिवसाचे कमाल तापमान ३१.६°C नोंदले गेले. रत्नागिरी येथील कमाल तापमान ३१.२°C, नाशिक ३५°C कोल्हापूर ३५°C आणि पुणे ३५.३ °C नोंदले गेले.
[yuzo_related]
स्काय मेट हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर आणि ईशान्येकडून मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोंकण भागावर वारे वाहत आहेत. उत्तर आणि ईशान्य दिशेकडून येणारे वारे पुढील २४ ते ४८ तास राहतील. त्यानंतर वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होईल, ज्यामुळे तापमानात परत वाढ होईल. ठाणे, रत्नागिरी, सोलापूर, पुणे आणि नाशिक येथे हवामान उष्ण आणि कोरडे राहील.
स्काय मेट च्या हवामान अंदाजानुसार, दक्षिण कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कोणताही बदल होणार नाही.
शेतकरी बांधवासाठी सूचना
शेतकरी बांधवानी रब्बी पिके तसेच पक्व फळपिकांची काढणी करावी. शेतकरी बांधवानी वाढलेल्या तापमानामुळे उन्हाळी भुईमूग आणि भाताच्या पिकास नियमित पाणी द्यावे.
Image Credit: tripadvisor
Any information taken from here should be credited to skymetweather.com