[MARATHI] गुजरात आणि महाराष्ट्रातील तापमानाचा चढता पारा

April 29, 2015 7:03 PM | Skymet Weather Team

सध्या भारतात बऱ्याच ठिकाणी  आल्हाददायक वातावरण असताना मात्र गुजरात आणि महाराष्ट्र प्रचंड गरमीला सामोरे जात आहे. या दोन्ही राज्यातील कमाल तापमान हे सरासरीपेक्षा २ ते ४ से. ने वर असून तेथील जनसामान्यांना हे उष्ण दिवस खूपच त्रासदायक वाटू लागले आहे.

गेले काही दिवस हि तापमानातील वाढ गुजरात अनुभवत होताच आता महाराष्ट्रही त्याला सामील झालेला दिसतो. याआधी महाराष्ट्राने मात्र वातावरणातील बदलांमुळे झालेले पाऊस किंवा वादळी पावसामुळे थोडे चांगले दिवस अनुभवले आहेत.

स्कायमेट या भारतातील हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारताकडे पाकिस्तानच्या दिशेने म्हणजेच वायव्य दिशेने येणारे कोरडे वारे हे गुजरात वर येतात आणि त्याची झळ हि महाराष्ट्रालाही बसलेली आहे. आणि त्यामुळेच या दोन्ही राज्यात तापमानात कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे.

स्कायमेट ने वर्तविल्यानुसार या परिस्थितीत आजून तरी काही दिवस बदल होणार नाही.

गेल्या दोन दिवसात दोन्ही राज्यातील कमाल तापमानाच्या नोंदी पुढील प्रमाणे

 

Featured Image Credit (rashminsanghvi.com)

OTHER LATEST STORIES