Skymet weather

[Marathi] परभणी, मुंबई, कोल्हापूर, मालेगाव, अमरावतीमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता

September 13, 2017 12:47 PM |

Rain in Maharashtraमहाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलेली आहे. खरं तर, सप्टेंबर महिन्यात राज्यातील फक्त काही भागांमध्येच हलक्या व तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे.

तथापि, वरूणदेवाने महाराष्ट्रातील रहिवाशांवर आपली कृपादृष्टी पुन्हा दाखवली आहे, त्यामुळे मागील २४ तासांत राज्यातील अनेक भागांवर मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे. गेल्या २४ तासांत, मुंबईत १०३ मिमी, औरंगाबादमध्ये ८२ मिमी, जालना येथे ५३ मिमी, बुलढाणा ४६ मिमी, अलीबाग ४४.४ मिमी, भिरा ४५ मिमी, गोंदिया ३९.३ मिमी, जेऊर २० मिमी, कोल्हापूर ३६.४ मिमी, मालेगाव २३ मिमी, नाशिक १६.६ मिमी आणि परभणी येथे १३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

Check the live status of lightning and rain across Maharashtra

सध्या राज्यात सुरु असलेल्या पावसाचे मुख्य कारण उत्तर मध्य-महाराष्ट्रापासून दक्षिणपूर्व अरबी समुद्रापर्यंत विस्तार असलेला कमी दाबाचा पट्टा आहे, व हा पट्टा असाच टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस, राज्यातील बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा व एक किंवा दोन ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील चांगला पाऊस अपेक्षित आहे.

[yuzo_related]

प्रामुख्याने जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, परभणी, कोल्हापूर, भिरा, महाबळेश्वर आणि मुंबई या शहरांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे, या शहरांमधील हवामान नक्कीच आल्हाददायक होईल.

पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, या अपेक्षित असलेल्या पावसामुळे विदर्भातील पावसाची तूट कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि महाराष्ट्रातील इतर उपविभागांमध्ये देखील पावसाची सरासरी वाढेल.

Image credit: www.india.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try