Skymet weather

[Marathi] जुलै मधील विक्रमी पावसानंतर पुणे आणि नाशिकमध्ये ऑगस्टची सुरुवातही जोरदार पावसाने

July 31, 2019 3:48 PM |

Mahrashtra rainsविदर्भातील अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे. गडचिरोली मध्येही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. नाशिकमध्ये ही पूरसदृश परिस्थिती आहे, तर पुण्यातदेखील जुलै महिन्यात प्रचंड पाऊस झाला आहे.

महाराष्ट्र राज्य चार विभागांमध्ये विभागले गेले आहे, कोकण आणि गोवा हा पहिला सर्वाधिक पावसाचा विभाग असून त्यानंतर विदर्भ , मराठवाडा आणि शेवटी मध्य-महाराष्ट्र जेथे सर्वात कमी पाऊस पडतो. पुणे आणि नाशिक ही मध्य महाराष्ट्रात येणारी शहरे असून राज्यातील सगळ्यात कमी पावसाची शहरे आहेत. येथे पावसाळ्याच्या हंगामात प्रामुख्याने हलका पाऊस पडतो आणि वातावरण आल्हाददायक असते. दिवसाचे तापमान सामान्यतः ३० अंशापेक्षा कमी असते.

तथापि, यंदा विक्रमी पाऊस पडल्याने पुणे आणि नाशिकसाठी यंदाचा मान्सून हंगाम वेगळा ठरला आहे. पुण्यामध्ये जुलै मध्ये सामान्य १८७.२ मिमी पावसाच्या तुलनेत ३६३.४ मिमी पाऊस झाला तर नाशिक शहरात सामान्य १५६.१ मिमी पावसाच्या तिप्पट ४९६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या आकडेवारीनुसार,या दोन्ही शहरांनी जुलै महिन्यामधील दहा वर्षांतील पावसाचे विक्रम मोडले असून सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाळी ठिकाणे ठरले आहेत. नाशिकमध्ये इतका जोरदार पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ नसून शहरात सलग तीन वर्षे जुलै मध्ये विक्रमी पाऊस पडत आहे.

पुढील २४ तासांच्या पूर्वानुमानाविषयी बोलायचे झाल्यास नाशिक आणि पुण्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल जो पुढील दोन दिवस सुरू राहील. तर पुढील संपूर्ण आठवडाभर पावसाची शक्यता आहे.

प्रतिमा क्रेडीट: बिज़नेस इनसाइडर

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try