नैऋत्य मान्सूनच्या काळात जुलै आणि ऑगस्ट हे महिने मुख्य महिने असतात कारण याच दोन महिन्यात भरपूर पाऊस होतो. नैऋत्य मान्सूनचा चार महिन्याचा प्रवास जून महिन्यात सुरु होतो. यंदा या महिन्यात भरपूर पाऊस झाला. तसेच सप्टेंबर महिना हा मान्सूनच्या प्रवासचा अखेरचा टप्पा असतो आणि या काळात तुरळक स्वरूपाचा पाऊस होतो.
मान्सूनचा परतीचा प्रवास हा कधीही १ सप्टेंबरच्या आधी सुरु होत नाही आणि याची सुरुवात हि नेहमी पश्चिम राजस्थानच्या टोकापासून होते. मान्सून हि एक अशी किचकट घटना आहे कि त्याच्या आगमनाची आणि परतीची वेळ जाहीर करताना फारच काळजी घ्यावी लागते. वरील आकृतीत भारतातील यंदाच्या आणि नेहमीच्या मान्सूनच्या परतीच्या वेळा दिलेल्या आहेत.
भारतात ज्याप्रमाणे मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट बघितली जाते त्याप्रमाणे त्याच्या परताव्याचा काळ निश्चित असतो. या परतीच्या प्रवासाचे सुद्धा काही निकष ठरलेले आहेत ते बघूया
1. पावसाची समाप्ती
2. ढगांच्या आवरणात होणारी घट
3. हवेच्या प्रवाहात होणारा बदल
4. आर्द्रतेत होणारी घट
5. तापमानात होणारी वाढ
6. राजस्थानात प्रतिचक्रवाती प्रणालीला सुरुवात.
हे सर्व घटक सर्वसाधारपणे ५ दिवस आधी ठराविक ठिकाणी अभ्यासले जातात आणि नंतरच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात जाहीर केली जाते. यासर्व घटकांबरोबरच मान्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन ते हिमालयाच्या पायथ्याशी स्थिरावतात.
याचबरोबर आपण नकाशातील मान्सूनच्या परीतीच्या प्रवासाची रेषाही अभ्यासतो. हि रेषा कुठेही खंडित होताना दिसत नाही. सध्याच्या ताज्या हवामानाच्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने पश्चिम राजस्थानातून केव्हाच काढता पाय घेतल्याचे दिसून येते. दिनांक ७ सप्टेंबरला हि रेषा अनुपगड, नागपूर, जोधपुर आणि बारमेर यावरून जाताना दिसते आहे.
राजस्थानातील अजून काही भागातून मान्सूनच्या परताव्यासाठी वातावरण अनुकूल आहे तसेच पंजाब आणि हरयाणा येथेही वातावरण अनुकूल आहे. मान्सूनने काही ठराविक भागातून जरी काढता पाय घेतला तरी याचा अर्थ पाऊस पूर्णपणे थांबेलच असा होत नाही कारण भारताच्या उत्तरेला मान्सूनच्या परताव्या नंतरही पश्चिमी विक्षोभामुळे पाऊस होऊ शकतो.
मान्सूनच्या परताव्याची क्रिया हि फारच हळू असते. साधारणपणे या प्रक्रियेला राजस्थान आणि वायव्य भारतातून पूर्णपणे जायला १५ दिवस तरी लागतात. ईशान्य आणि द्विप्काल्पाच्या भागात मात्र या महिन्यात भरपूर पाऊस होतो. तसेच दैनदिन पावसाच्या सरसरीत सुद्धा घट होण्यास सुरुवात होते.