[Marathi] हिवाळा जवळ येवू लागल्याने राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान येथे तापमानात घट

November 18, 2019 1:44 PM | Skymet Weather Team

राजधानी दिल्लीत हंगामातील सर्वात कमी किमान ११.७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद १२ नोव्हेंबरला झाली. पहिल्यांदा सर्वात थंड पहाट अनुभवल्यानंतर हिमालयीन प्रदेशात लागोपाठ येणाऱ्या पश्चिमी विक्षोभांमुळे तापमानात वाढ होऊ लागली. वाऱ्यांनी देखील त्यांची दिशा बदलून पूर्वेकडून झाली आणि त्यात सतत इतकी वाढ झाली, की गेल्या दोन ते तीन दिवसांत तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिले.

आता, पश्चिमी विक्षोभ दूर झाल्यामुळे, पश्चिम हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांमधून बर्फाच्छादित-थंड वाऱ्यांचा प्रवाह उत्तर मैदानावर पुन्हा सुरू झाला आहे. परिणामी, तापमान पुन्हा कमी होवू लागले आहे. आज सफदरजंग वेधशाळेमध्ये १५.३ डिग्री सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. केवळ दिल्लीच नाही, तर उत्तर-पश्चिम भारतातील पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानमध्येही आता किमान तापमानात घट झाल्याच्या नोंदी होत आहेत.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, पश्चिम हिमालयात कोणतीही लक्षणीय पश्चिमी विक्षोभ येण्याची शक्यता नाही. २१ नोव्हेंबरच्या सुमारास एखादी प्रणाली विकसित होण्याची अपेक्षा आहे, परंतु ती कमकुवत असेल आणि फारसा फरक आणणार नाही. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. आणि हे सांगणे सुरक्षित आहे की या आठवडयाच्या अखेरीस हिवाळ्याला उत्तरेकडील मैदानात सुरुवात होईल. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी हिवाळ्याची गुलाबी थंडी देखील जाणवेल.

Image Credits – The Shillong Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES