उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी परतली असून मुंबईकरांवर आपल्या हिवाळी कपड्यांचा वापर करण्याची वेळ पुन्हा आली आहे.
स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, जानेवारीचा शेवटचा सक्रिय पश्चिमी विक्षोभ पुढे सरकल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला असून हे वारे भारतातून देशाच्या मध्य भागांपर्यंत म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत पोहोचत आहेत.
गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट नोंदली गेली. मुंबईतील किमान तापमान बुधवारच्या १९.४ अंशांवरून आज सकाळी १३.६ अंशांवर आले आहे.
केवळ मुंबईच नाही, तर महाराष्ट्रातील इतर अनेक शहरांमध्ये आज सकाळी किमान तापमानात घाट झाल्याची नोंद झाली आहे. उदाहरणार्थ, नाशिक आणि मालेगाव येथे प्रत्येकी ६ अंशांची घट झाली असून सकाळचे तापमान अनुक्रमे ७.९ आणि १० अंश सेल्सिअसवर गेले. जळगावातही ८.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली.
विदर्भातील बहुतेक ठिकाणी तर मराठवाड्यातील काही ठिकाणी तापमानत २ ते ३ अंशांनी घट झाली असून किमान तापमान सामान्यपेक्षा कमी असल्याचे जाणवत आहे.
हवामानाचा अंदाज
उत्तरेकडील थंड वारे आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहणे अपेक्षित आहे. हे वारे काही दिवस हवामान थंड आणि आनंददायी ठेवतील. विशेषतः किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून कमाल तापमानात देखील किरकोळ घट दिसू शकते. महाराष्ट्रासाठी या हिवाळ्याच्या हंगामातील शेवटची थंडी ठरणार आहे.
मुंबईत हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदविले
मुंबई शहरात १७ जानेवारी रोजी हंगामातील सर्वात कमी किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअस होते. तेव्हापासून तापमान वाढतच होतं आणि त्यामागचं प्रमुख कारण आर्द्र दक्षिण / आग्नेय दिशेने येणारे वारे हे म्हणता येईल.
मात्र, गेल्या २४ तासात वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलाने मुंबईकर या थंडीचा आनंद घेताना दिसू शकतात.
वारे पुन्हा बदलणार
हवामान प्रारूपं २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वाऱ्यांमध्ये बदल दर्शवित आहेत. पुन्हा एकदा, उत्तरेकडील थंड वाऱ्यांची जागा दक्षिण / आग्नेय दिशेने येणारे वारे घेण्याची अपेक्षा आहे. हे वारे रायलसीमा आणि अंतर्गत कर्नाटक येथून प्रवास करतात जेथे तापमान आधीच जास्त आहे. हे दमट वारे मुंबईतील तापमानात वाढ करू शकतात आणि हिवाळ्याच्या हंगामाचा शेवट करणारे ठरतील.
Image Credits – Mumbai Live
Any information taken from here should be credited to Skymet Weather