गेल्या काही दिवसांपासून भारताच्या द्वीपकल्पाच्या भागात चांगलाच व्यापक पाऊस सुरु आहे. हा पाऊस प्रामुख्याने लक्षद्वीप आणि त्यालगतच्या भागावर चक्रवाती अभिसरणाचे क्षेत्र तयार झाले असून हे हवेच्या वरील स्तरात समुद्र सपाटीपासून १.५ आणि ३.१ किमी दरम्यान आहे.
या प्रणालीचा प्रभाव तेलंगाणा पासून कर्नाटकाहून पुढे लक्षद्वीप पर्यंत होतो आहे. या प्रणालीमुळे दक्षिण कर्नाटकातील भाग, कर्नाटकची किनारपट्टी आणि त्यालगतचा तामिळनाडूचा भाग तसेच उत्तर केरळ या भागात व्यापकतेने आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
आंध्रप्रदेशच्या उत्तरेकडील किनारपट्टीला येत्या २४ तासात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच तेलंगाणा, रायलसीमा, तामिळनाडूची किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उरलेला केरळचा भाग या भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. तामिलनाडूच्या अगदीच दक्षिणेकडे असलेल्या भागात मात्र थोडाच आणि तुरळक पाऊस होईल.
कर्नाटकाचा दक्षिण भाग, केरळ, तामिळनाडूचा काही भाग, आंध्रप्रदेशची उत्तर किनारपट्टी आणि रायलसीमा या भागात गेल्या २४ तासांपासून चांगलाच पाऊस सुरु आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कारेकाल येथे ६१ मिमी, गुलबर्गा येथे ५६ मिमी, थिरूवनंतपुरम येथे २१ मिमी, कोची येथे १५ मिमी, बिजापूर येथे १३ मिमी आणि कोझीकोडी येथे १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या होणाऱ्या पावसामुळे या भागात असलेली पावसाची उणीव आणि कमतरतेची टक्केवारी नक्कीच कमी होण्यास मदत होईल. सध्यस्थितीत तेलंगाणा येथे २७% कमी पाऊस झाला असून या पावसामुळे हि तुट भरून निघण्यास मदत होऊन हि आकडेवारी साधारण पातळीवर येऊ शकते. तसेच उत्तर कर्नाटकाच्या आतील भागातही नेहमीच्या सरासरीपेक्षा ४३% कमी पाऊस झाला आहे. केरळात सुद्धा ३३% कमी पाऊस झाला आहे. सध्या होणाऱ्या पावसामुळे या भागातील परिस्थितीतही सुधारणा नक्कीच होईल असा अंदाज आहे.