स्कायमेट आणि इतर हवामान संस्थांच्या अंदाजानुसार केरळात मान्सून वेळेआधीच दाखल होणार होता मात्र आता मान्सून ४ जून पर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. याआधी दिलेल्या अंदाजानुसार मान्सून १ जून ला आपली हजेरी लावणार होता त्यात मात्र आता तीन दिवस उशीरच होणार आहे.
मान्सून आगमनास होणाऱ्या उशिराची कारणे:
मान्सून येतो म्हणजे नक्की काय होते तर हि एक सागरी आणि वातावरणात घडणारी घटना असून याबरोबर बऱ्येच घटक आपली कामगिरी बजावत असतात आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे मान्सून. पाऊस येणे म्हणजेच फक्त मान्सून असे मानले जाते पण त्याबरोबर बऱ्याच घटकांचा समावेश असतो. हिंदी महासागरात पाऊस, आर्द्रता, हवेची दिशा, हवेची क्षमता आणि पृथ्वी पासून बाहेर पडणाऱ्या लांब तरंगाचे उत्सर्जन (OLR) यांचा मान्सून क्षेत्राच्या जवळपासच्या भागात यांचा मेळ होणे आवश्यक असते. यापैकी एकाजरी घटकात थोडाफार बदल झाल्यास मान्सूनच्या आगमानावर प्रश्न निर्माण होऊ शकतो.
एखाद्या क्षेत्रावर असलेले ढग आणि हवा हे सुद्धा सुसंघटीत असले पाहिजे. समुद्राच्या एका बाजूला ढगांची दाट गर्दी झाली जी थोड्या दिवसांपूर्वी दिसत होती आणि त्यामुळेच मान्सून केरळला आधी येणार असे चिन्ह दिसत होते. मात्र आता याची तीव्रता कमी होऊन हे ढग इतरत्र विखुरलेले असून त्यांची क्षमता देखील कमी झालेली आहे आणि त्यामुळेच बाहेर पडणाऱ्या लांब तरंगाचे उत्सर्जन जास्त प्रमाणत होताना दिसून आले आहे.
हवा किंवा वाहणारे वारे हा पण एक महत्वाचा घटक असतो. सध्या हे वारे नैऋत्यदिशे कडून न वाहता वायव्य दिशेकडून वाहत आहेत आणि याला कारण म्हणजे अरबी महासागरात निर्माण झालेला जास्त दाबाचे हवेचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचा प्रभाव आता कमी होत असून हवेच्या दिशेतही बदल होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळेच मान्सूनची आगेकूच होण्यासही मदत होईल.
आणि शेवटचा घटक म्हणजे पाऊस कि जो भरपूर प्रमाणात आणि भरपूर काळ टिकणारा असावा. सध्या भारताच्या द्वीपकल्प आणि केरळात मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस होत असून त्याची तीव्रताही फारशी नाही. उदाहरणादाखल बघायचे झाल्यास रविवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात केरळातील कोची आणि कोत्त्याम येथे अनुक्रमे ३९.४ मिमी आणि ३१.४ मिमी पावसाची नोंद झाली तसेच तिरुवनंतपुरम येथे फक्त १५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तसेच बऱ्याच भागात कमी पावसाची नोंद झाली असल्यामुळे केरळात अजूनही मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे.
तसेच स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाच्या हवामान अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या मॉडेल्स नुसार अरबी समुद्रात जे जास्त दाबाचे हवेचे क्षेत्र निर्माण झाले होते त्याची तीव्रता आता कमी होऊन ३ ते ४ जून पर्यंत नाहीसे होईल असा अंदाज आहे आणि यामुळेच मान्सूनला पूरक घटक पूर्ववत होऊन मान्सूनची आगेकूच सुरु होईल.
Image Credit: msnbcmedia.com