Skymet weather

[MARATHI] स्कायमेट साधारण मान्सूनच्या अंदाजावर का ठाम आहे

June 3, 2015 6:40 PM |

Monsoon In India 2015या वर्षाच्या सुरुवातीपासूनच एलनिनो या शब्दाने सर्वांच्या मनात भीती निर्माण केली आहे. या छोट्याश्या खोडकर मुलासारख्या असणाऱ्या या प्रकाराने सर्वांच्याच मनात यंदा पाऊस कमी होईल कि काय अशी दहशत निर्माण केली आहे. पण आमची संस्था मात्र मार्च महिन्यापासून सांगत आली आहे कि यंदा चांगला मान्सून होईल. सध्यस्थितीत यावर खुलासा करणे मी माझे कर्तव्य समजतो आणि म्हणूनच या लेखात मी स्पष्ट करू इच्छितो कि मी आणि आमची संस्था मान्सूनच्या अंदाजावर एवढे ठाम का आहोत.

पहिल्यांदा आपण याचा सांखिकीय दृष्टीने विचार करू या, एलनिनो मुळे नेमके काय होते? एलनिनो मुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात जास्त प्रमाणत उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे दोन गोष्टी घडू शकतात जगात वेगवेगळ्या ठिकाणी एकतर पूर येऊ शकतो किंवा दुसरे म्हणजे दुष्काळ निर्माण होऊ शकतो. एलनिनो मुळे भारतातील मान्सूनवर परिणाम होतो हे खरे आहे. (एलनिनो चा प्रभाव असलेल्या वर्षात ६० टक्के दुष्काळाची नोंद आहे.) २००० सालापसून जी दुष्काळाची वर्षे (०२, ०४, ०९, १४) झाली त्याला एलनिनोच जवाबदार आहे पण प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच.

आतापर्यंत आपण बघितले की १९५३ ते १९६३ या वर्षात चार वेळा एलनिनोचा प्रभाव होता पण त्यावेळीही चांगल्या मान्सूनची नोंद आहे. आणि जर आपण बघितले तर असे लक्षात येईल गेल्या वर्षीच्या एलनिनोचा प्रभाव यावर्षीही पुढे तसाच होत असेल तर त्याचा परिणाम मान्सूनवर फारसा होत नाही. २०१४ मध्येही एलनिनोचा प्रभाव होता आणि दुष्काळ (८८ %) पण झाला होता आणि हाच गेल्या वर्षीचा एलनिनो यावर्षीही आपला प्रभाव दाखवतो आहे पण याचा फारसा परिणाम मान्सूनवर होणार नाही.

 

 

सलग दुष्काळ पडणे दुर्मिळच

हवामान शास्त्रानुसार लागून दोन वर्षे दुष्काळ होण्याची शक्यता खूपच धूसर असते. गेल्या १४० वर्षांचा अभ्यास बघितल्यास आतापर्यंत फक्त चार वेळा असे घडले आहे (१९०४-०५, १९६५-६६ आणि १९८५-८६-८७) आणि आता तर गेल्याच वर्षी एलनिनो मुळे दुष्काळ होऊन गेला आहे आणि यामुळेच यंदा नॉर्मल मान्सून होईल.

स्कायमेटचे डायनामिक मॉडेल

२०१२ पासून जवजवळ दहा वर्ष पेक्षा जास्त काळापासून स्कायमेट या संस्थेत डायनामिक मॉडेल वर काम सुरु आहे. २०१२ पासुन या मॉडेल चा वापर करून दिलेला हवामानाचा अंदाज अचूक ठरलेला आहे. स्कायमेट ने आतापर्यंत एकदा पावसाची तुट आणि एकदा दुष्काळ होणार हे बऱ्याच आधी वर्तविले होते आणि तेही अगदी अचूक होते. तसेच आम्ही येथे गेल्या ३० वर्षातील माहितीचा चा अभ्यास या मॉडेल च्या आधारे करून बघितले असून त्यात ७४% यश मिळाले आहे. हेच मॉडेल आम्हाला जानेवारी महिन्यापासून चांगला मान्सून होणार असे सातत्याने दर्शविते आहे आणि यातही एलनिनोचा प्रभाव लक्षात घेतलेला आहे.

Why Skymet is sticking to a normal Monsoon in 2015

एलनिनोचा ओघ आणि सशक्तीकरण

येथे मला एक कबुली द्यावीशी वाटते. आम्ही (स्कायमेट) मार्च महिन्यापासून एकाच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहोत कि गेल्या वर्षीचाच एलनिनो या वर्षी पुढे सुरु आहे आणि या ओघातच तो कमी होईल. आमची पहिली बाब खरी ठरली मात्र दुसरी बाब चुकली. पूर्व प्रशांत महासागरातील एलनिनोची तीव्रता वाढली असून तो चांगलाच सशक्त झाला. पण असे जरी असले तरी आम्हाला याची जाणीव आहे आणि आमच्या मॉडेल्स नेही या सशक्त एलनिनोला अभ्यासात समाविष्ट करूनच अंदाज दिलेला आहे.

आमचे मॉडेल आणि सांखिकी अजूनही एकत्रितपणे हेच सांगते आहे कि चांगला मान्सून होण्यास कोठेही तिळमात्र शंका नाही.

मला असा संशय आहे कि या सर्व गोष्टीना हिंदी महासागरातील द्विधृविकरण (IOD) कारणीभूत असावे. हे द्विधृविकरण म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावर दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या तापमानाचे क्षेत्र निर्माण होते म्हणजेच अरबी महासागराचा पश्चिम धृव आणि बंगालच्या उपसागराचा पूर्व धृव बघितल्यास जेंव्हा पश्चिम धृवाचे तापमान पूर्व धृवापेक्षा जास्त होते तेव्हा द्विधृविकरण होते. आणि हि स्थिती भारतातील मान्सूनसाठी पूरक असते आणि एलनिनोचा प्रभाव कमी होण्यासही मदत होते.

मी या प्रणालीला प्राधान्य देऊ इच्छितो आणि हे हि स्पष्ट झाले आहे कि अरबी समुद्रातील तापमान मान्सूनच्या काळात जास्तच असणार आहे आणि त्यामुळेच मान्सूनचा पाऊस अधिक चांगला होईल.

१९९७ मध्ये सशक्त एलनिनो होता पण त्यापेक्षाही प्रभावी द्विधृविकरण (IOD) असल्याने त्यावर्षी चांगल्या (१०२%) मान्सूनची नोंद झाली. वेगळ्या शब्दात म्हणयचे झाल्यास द्विधृविकरण (IOD) हे आपले एल निनो पासून संरक्षणच करते. तसेच १९८७ साली सशक्त एलनिनो मुळे दुष्काळ निर्माण झाला होता. बऱ्याच हवामान संस्था या वर्षाची तुलना १९८७ सालाबरोबर करीत आहे पण आम्ही याची तुलना १९९७ बरोबर करत आहोत.

आणि म्हणूनच माझा एक वार्ताहर मित्राने “दबंग स्कायमेट १०२ वर ठाम “ असे वक्तव्य केले आहे.

चक्रीवादळांचा पश्चिम प्रशांत महासागरावरील परिणाम

जागतिक पातळीवरील हवामानाच अंदाज देणाऱ्यांनी अजून एक प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणजे वाढती चक्रीवादळे आणि त्यांचा होणारा परिणाम म्हणजे पावसात होणारी तुट. एलनिनोच्या प्रभावामूळे पश्चिमेकडील प्रशांत महासागरात चक्रीवादळाचे प्रमाण वाढत आहे. पण या सागरात वर्षभरात २० तरी चक्रीवादळे होत असतात. या वादळांचा मान्सुनवरही परिणाम होतो पण दुष्काळ स्थिती निर्माण करण्या इतका नक्कीच नाही.

(वरील लेख हा जतिन सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्कायमेट यांच्या मूळ इंग्रजी लेखाचे भाषांतर आहे)

Image Credit: allpost.com

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try