Skymet weather

[Marathi] पश्चिम किनारपट्टीला पावसाचा जोर वाढणार

July 9, 2015 5:32 PM |

West coast rainपश्चिमी किनारपट्टी आणि ईशान्य भारत हे भाग नैऋत्य मान्सूनच्या काळातील सर्वात सक्रीय भाग असतात म्हणजेच या भागात सर्वात जास्त पाऊस होतो. मान्सूनच्या सुरुवातीलाच पश्चिमी किनारपट्टीलाच्या ज्या भागात चांगला पाऊस झाला ते म्हणजे केरळ, कर्नाटकाची किनारपट्टी, कोकण आणि गोवा तसेच या भागातील मासिक सरासरीही चार अंकी झालेली दिसून आली.

चांगल्या पावसाची नोंद होण्यासाठी चांगला पाऊस होणे गरजेचे असते आणि जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कमी पाऊस झालेला आहे. आतापर्यंत कमी पावसामुळे केरळात ३०% तुट निर्माण झाली आहे तसेच कर्नाटकमध्ये ३२% तुटवडाआणि कोकण आणि गोव्यात १५ % पावसाची तुट निर्माण झालेली आहे.

एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघितल्यास जुलै महिन्यात ज्या भागात चांगला पाऊस होऊन त्याची नोंदही चांगली झालेली आहे असे काही भाग म्हणजे मंगरूळ येथे ११०४ मिमी, कारवार येथे ९७९ मिमी, गोवा येथे ९०० मिमी, मुंबई येथे ८०० मिमी तसेच कोझिकोडे येथे ८१६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

पश्चिम किनारपट्टीला झालेला कमी पावसामुळे तसेच बऱ्याच भागातील पावसाची नोंद फार कमी आहे. वर असलेल्या भागांपैकी फक्त गोव्याला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आणि ती म्हणजे १६० मिमी. आणि मंगरूळ येथे फक्त ७१ मिमी पावसाची नोंद झाली तसेच कारवार येथे ३४.३ मिमी आणि मुंबई येथे १०.५ मिमी आणि कोझिकोडे येथे ६६.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

पण सध्यपरिस्थितीत पश्चिमी किनारपट्टीला पावसाचा जोर वाढेल असे दिसून आले आहे. हा आठवडा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापेक्षा नक्कीच चांगला जाईल. हवामानाची सक्रियता हि नेहमीच एकसारखी नसते पण तरीही येत्या आठवड्यात हा संपूर्ण पट्टा सक्रीय असणार आहे आणि त्यामुळेच पश्चिमी किनारपट्टीला चांगला पाऊस होईल. सर्वात आधी मान्सूनचा हा पट्टा केरळ आणि कर्नाटकाची किनारपट्टी येथे प्रभावी होईल आणि मग नंतर पश्चिमी किनारपट्टीलगतच्या उर्वरित भागांना पाऊस होईल.

बुधवारी सकाळी ८.३० वाजेपासून गेल्या २४ तासातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे, केरळ मधील कोन्नुर येथे ४०.६ मिमी, कोत्तयाम येथे ३१.२ मिमी आणि कोझीकोडी येथे ५३.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच कर्नाटकाची किनारपट्टी मंगरूळ येथे ३८.६ मिमी, होनावर येथे १९.४ मिमी, गोवा येथे २३ मिमी, अगुंबे येथे ११०.८ मिमी आणि मादिकरी येथे ४० मिमी पावसाची नोंद झालेली आहे. संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, कोची, गोवा आणि इतर काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try