गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात वायव्येकडे असलेल्या एका अशक्त चक्रवाती अभिसरणाच्या प्रणालीमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला चांगलाच पाऊस सुरु आहे. तसेच या प्रणालीचा प्रभाव कर्नाटकापर्यंत होताना दिसतो आहे. या दोन्ही हवामान प्रणालींमुळे किनारपट्टी तसेच उत्तर कर्नाटकाचा आतील भाग, महाराष्ट्राची किनारपट्टी आणि दक्षिण गुजरात येथे चांगला पाऊस सुरु आहे.
रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कर्नाटकातील कारवार येथे ११६ मिमी पाऊस झाला असून महाराष्ट्राच्या किनारपट्टीला असलेल्या भिरा येथे ८८ मिमी, अमरेली येथे ५५ मिमी, होनावर येथे ४५ मिमी, मुंबई येथे २१ मिमी, अगुंबे येथे २० मिमी, गुलबर्गा येथे २४ मिमी, बिजापूर येथे २० मिमी आणि रायचूर येथे ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या पावसाची तीव्रता किनारपट्टी कडील कर्नाटक आणि उत्तर कर्नाटक या भागात अजून वाढणार आहे. मध्य कर्नाटकात सर्वसाधारणपणे नेहमीच मान्सूनचा पाऊस चांगला होतो परंतु यंदा मात्र या भागातही २८% कमी पाऊस झाला आहे. तसेच एकीकडे उत्तर कर्नाटकातील भागात मात्र पावसाची कमतरता हि संपूर्ण मान्सुनभर होती आणि आता हि पावसाची कमतरता २६% वर येऊन पोहचली आहे. उत्तर कर्नाटकातील भागात पावसाची कमतरता जून ते ऑगस्ट दरम्यान होती. तसेच सप्टेंबर महिन्यात मात्र या भागात मान्सूनचा चांगलाच पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात व्यापकतेने मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच आहे.
येत्या ४८ तासात या भागात असाच चांगला पाऊस येतच राहील असा अंदाज आहे. तसेच दक्षिण गुजरातमध्ये सुरु असलेल्या पावसाची तीव्रताही कमी होईल कारण या भागावरील चक्रवाती अभिसरण हे क्षिण झालेले आहे.
Image Credit: livemint.com