सध्या नैऋत्य मान्सून कर्नाटकच्या किनारपट्टीसह उर्वरित पश्चिमी किनारपट्टीला एकदम जोमदारपणे कार्यान्वित झाला आहे.
सध्या पश्चिमी किनारपट्टीला मान्सूनच्या लाटेची तीव्रता कोकण आणि गोव्यापासून थेट कर्नाटक ते केरळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. येत्या काही दिवसात किनारपट्टीजवळील कमी दाबाच्या क्षेत्रचा प्रभाव वाढणार आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटक केरळात पावसाची तीव्रता वाढणार आहे. तसेच येत्या २४ तासात मुंबईतही चांगलाच पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.
रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात पश्चिमी किनारपट्टीला झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
कर्नाटकच्या किनारपट्टीला पावसाची कमतरता २५ टक्के असून केरळची २६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
पश्चिमी किनारपट्टीला होणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या पावसामुळे त्या भागातील पावसाचा तुटवडा भरून निघेल. जूनच्या अखेरीस कर्नाटकाच्या किनारपट्टीला आणि केरळ येथे पावसाची तुट अनुक्रमे १८ % आणि १३ % होती. तसेच जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या पावसाच्या कमतरतेमुळे या टक्केवारीत वाढ झाली होती.
सर्वसामान्यतः जुलै आणि ऑगस्ट महिने पश्चिमी किनारपट्टीसाठी भरपूर पावसाचे असतात. सुरुवातीलाच दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी किनारपट्टीजवळ असेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढलेली असल्याने तेथे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
Image Credit: travelblog.keralaholidaymart.com