आतापर्यंत पूर्व भारतातील बिहार आणि पश्चिम बंगाल येथे मान्सूनच्या पावसाला सुरुवात म्हणावीतशी झाली नव्हती. स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार सध्या बिहार मध्ये ७०% आणि पश्चिम बंगालमध्ये ४०% कमी पाऊस झाला होता. पण २१ जून पासून झालेल्या चांगल्या पावसामुळे हि पावसाची तुट भरून निघालेली असून आता बिहार येथे ५७% आणि पश्चिम बंगाल येथे १३% पर्यंत आलेली आहे.
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात श्रीनिकेतन येथे १२०.७ मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या १० वर्षातील २४ तासात होणाऱ्या सर्वोच्च पावसाची नोंद झालेली आहे.
पश्चिम बंगाल मधील अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली त्यात कुचबिहार येथे ७४.६ मिमी, क्रीशनगर येथे ५४.६ मिमी, बहरामपूर येथे ४९ मिमी, बुर्द्वान येथे ३६.५ मिमी, मालदा येथे ३९ मिमी आणि जलपैगुरी येथे २५.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
बिहारमध्येही काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात भागलपूर येथे ६६.१ मिमी पावसाची नोंद झाली तसेच पुर्णीया येथे २२.८ मिमी पाऊस झाला. बिहारची राजधानी पटना येथेही १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बांगलादेश आणि बिहारवर निर्माण झालेल्या चक्रवाती हवेचे क्षेत्रामुळे या भागात चांगला पाऊस होतो आहे. स्कायमेट या संस्थेतील हवामान तज्ञांनुसार येत्या २४ ते ४८ तासात पूर्व भारतातील बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
Image credit: viewpatna.blogspot.com