[Marathi] मुंबईत उष्ण आणि आर्द्रतापूर्ण वातावरण

May 26, 2015 5:41 PM | Skymet Weather Team

गेले काही दिवस मुंबईकर सतत वाढते तापमान आणि त्याचबरोबर असणारी आर्द्रता यांचा सामना करत आहेत. अंगाची लाहीलाही करणारी गरमी आणि प्रचंड घाम काढणारी आर्द्रता यामुळे मुंबईतील वातावरण अगदीच असह्य वाटू लागले आहे.

सध्यस्थितीत तरी मुंबईवर कुठलीच हवामान प्रणाली दिसलेली नसून तेथिल कमाल तापमान ३० अंश से. जवळ किंवा त्यापेक्षाही जास्त आहे तसेच किमान तापमानही २० अंश से. पेक्षा जास्तच आहे. सोमवारी मुंबईत मासिक सरासरी कमाल तापमानापेक्षा (३३.३ अंश से.) २ ते ३ अंश से. जास्त (३५.२ अंश से.) कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तसेच किमान तापमानही (२९ अंश से.) २ अंश से. जास्तच होते. मुंबईतील वातावरण असह्य होण्यासाठी फक्त वाढते तापमानच कारणीभूत नसून तेथील आर्द्रतेच्या पातळीत झालेली वाढही आहे.

यात्रासातून फक्त संध्यकाळी आणि रात्री समुद्राकडून येणाऱ्या हवेमूळे थोडा दिलासा मिळतो आणि वातावरण थोडेसे सुसह्य होते.

स्कायमेट या भारतातील हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार येते ५ ते ६ दिवस तरी असेच वातावरण असेल कारण मुंबईवर किंवा जवळपास अशी एकही वेगळी हवामान प्रणाली दिसलेली नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत एकही वेगळी हवामान प्रणाली दिसलेली नाही. गेल्या आठ वर्षातील माहितीनुसार फक्त सहा वर्षात मुंबईत मे महिन्यात पाऊस झाल्याची नोंद असून उरलेले दोन वर्ष कोरडेच होते.

नैऋत्य मान्सूनपूर्व काळात मुंबईत बऱ्याचदा पाऊस आणि गडगडाटासह वादळी पाऊस येतो. मुंबईत सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन १० जूनच्या आसपास होते परंतु यावर्षी मान्सूनच्या हालचालीत आलेल्या शिथिलतेमुळे मान्सूनचे आगमन आठवडाभर तरी लांबलेले असून १५ जूनच्या आसपास मान्सून मुंबईत येऊन पोहचेल असा अंदाज आहे.

Image credit: www.youtube.com

 

OTHER LATEST STORIES