सोमवारी असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सज्ज झाले असून हवामान यात मोठी भूमिका बजावणार असल्याचे दिसून येत आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगला पाऊस पडत आहे.
गेल्या २४ तासांत मुंबईच्या सांताक्रूझमध्ये १८ मिमी, पुण्यात ३८ मिमी, हर्णे येथे ५९ मिमी, अलिबागमध्ये २२ मिमी, कोल्हापूरमध्ये ४६ मिमी, परभणी येथे ९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्राच्या इतर अनेक भागातही चांगला पाऊस झाला आहे. अरबी समुद्रावर कायम असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात हा पाऊस अनुभवला जात आहे.
आजही मुंबई व उपनगरामध्ये विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील. मुंबईत एक-दोन जोरदार सरींसह हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.त्याचप्रमाणे आज पुण्यातही एक किंवा दोन चांगल्या सरी अपेक्षित आहे.
उद्यापर्यंत मुंबईत पावसाचा जोर कमी होईल. तथापि, उद्या म्हणजेच मतदानाच्या दिवशी देखील महाराष्ट्रातील बर्याच भागात पावसाळी गतिविधी सुरूच राहण्याची अपेक्षा आहे.
उद्या, मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा असून मध्य आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात तीव्र सरींच्या शक्यतेमुळे सुरु असलेल्या निवडणुकीच्या कामकाजात अडचणी उद्भवू शकतात.
दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच कोकण आणि गोवा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आता पावसाचा जोर कमी होईल. मात्र या भागात पावसाचा लपंडाव सुरूच राहील.
महाराष्ट्रात येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार असून २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी मात्र मध्य-महाराष्ट्रात तुरळक सरींची अपेक्षा आहे. दरम्यान या काळात विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात पाऊस तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.
साधारणपणे ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस ओसरत असतो. मात्र सध्याचा चांगला पाऊस मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रातील बर्याच भागांसाठी मान्सूननंतरच्या मोसमात अनुभवण्यात आलेला अपवादात्मक पाऊस आहे.
दरम्यान या पावसाळी गतिविधींनंतर हवामान कोरडे होईल आणि त्यानंतरचा एक आठवडा तरी पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्रात कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामान विषयक गतिविधींची अपेक्षा नाही.
Image Credits – Hindustan Times
Any information taken from here should be credited to Skymet Weather