[Marathi] उद्या साठी संपूर्ण भारताचा हवामान अंदाज

June 7, 2019 3:23 PM | Skymet Weather Team

उत्तर भारत

उत्तर भारतात, पश्चिमी विक्षोभ पूर्व दशेत चालला आहे, याशिवाय, एक चक्रवाती परिस्थिती मध्य पाकिस्तानवर बनलेली आहे ज्यामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, उत्तर पश्चिम भागात हवामान कोरडे राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या तापमानात वाढ दिसून येईल.

मध्य भारत

मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोंकण व गोव्याच्या बऱ्याच भागात येणाऱ्या दोन दिवसात विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येईल. याशिवाय, विदर्भात देखील येणाऱ्या २४ तासात हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु रहिवाशांना उष्णतेच्या लाटांचा अजून काही दिवस सामना करावा लागेल. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि पुणे या ठिकाणी पूर्व मॉन्सूनचा पाऊस अनुभवण्यात येईल. मुंबई मध्ये आकाश ढगाळसह हलक्या पावसाची शक्यता आहे. ११ जून रोजी पूर्व मॉन्सूनचा जोर मुंबई शहरात वाढेल व १४ किंवा १५ जूनच्या आसपास मुंबईत मॉन्सूनचे आगमन होणे अपेक्षित आहे.

[Marathi] पाणी विशेषज्ञांनुसार मराठवाडा मरूभूमी होण्याच्या वाटेवर

पूर्व आणि उत्तर पूर्व भारत

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण बांगलादेश आणि लगतच्या गंगीय पश्चिम बंगालवर बनलेली आहे ज्यामुळे उत्तर पूर्व भारतात पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा आणि उत्तर पूर्व बिहार मध्ये काही ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे. झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेश मध्ये हवामान कोरडे राहील. उत्तर पूर्व भारतात मॉन्सून २४ तासात पोहोचणे अपेक्षित आहे.

दक्षिण भारत

दक्षिण भारतात, एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण पूर्व अरब सागरावर बनलेली आहे. एक कमी दाबाचा पट्टा लवकरच विकसित होणार आहे, ज्यामुळे असे दिसून येत आहे कि केरळात लवकरच मॉन्सूनचे आगमन होईल. केरळ आणि लगतच्या दक्षिण कर्नाटक मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. चेन्नई मध्ये हवामान मात्र कोरडे राहील. याउलट, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार द्वीपसमूह, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये पावसाची शक्यता आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES