जून महिन्यात ५२% जास्त पाऊस झाल्यावर जुलै मात्र विदर्भासाठी तसा कोरडाच गेला. जुलै मध्ये तुरळक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या पण तेवढा पाऊस सरासरी गाठण्यासाठी मात्र तोकडा पडला. पण आता विदर्भामध्ये ऑगस्टच्या सुरवातीला मात्र पावसाने पुनरागमन केले आहे. त्यामुळे जुलै अखेरीस असलेली १८% पावसाची तुट हि ऑगस्टच्या ८ तारखे पर्यंत ९% वर आलेली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार या भागावर येत्या २ ते ३ दिवसात विदर्भात अजून पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पश्चिमेला असलेले चक्रवाती हवेचे क्षेत्र आता ताकदवर होण्याची शक्यता असून ते भारतावर सरकेल असा अंदाज आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशची किनारपट्टी, तेलंगाना व विदर्भ येथे पाऊस होण्याची शक्यता आहे.
यादरम्यान विदर्भात काही ठिकाणी चांगला पाऊस सुरु झाला आहे. आज सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात चंद्रपूर येथे ४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर अकोला व बुलढाणा येथे अनुक्रमे १२ मिमी व ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तेलंगाना येथे सुद्धा पावसाची शक्यता
तेलंगाना येथील हवामान सुद्धा विदर्भा सारखेच होईल असा अंदाज आहे. जून महिना हा दोन्ही प्रदेशांसाठी चांगला पाऊस घेवून आला होता तर जुलै मध्ये मात्र दोन्ही ठिकाणी कमी पाऊस झाला. ऑगस्ट मध्ये पावसाची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत तेलंगाना येथे २७% कमी पाऊस झाला आहे. पण आता या आधी उल्लेखलेली बंगालच्या उपसागरातील चक्रवाती हवामान प्रणाली या भागावर येत्या २ ते ३ दिवसात चांगला पाऊस घेवून येईल व त्यामुळे हि पावसाच्या प्रमाणात झालेली तुट थोडी भरून निघेल असे वाटते आहे.
Image Credit: amazonaws.com