चक्रीवादळ वायु एक नवीन ट्विस्ट घेऊन आलेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे की अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु सौराष्ट्र कोस्टशी दूर जाण्याची शक्यता आहे. सक्यमेटच्या अंदाजानुसार, चक्रीवादळ वायुने उत्तर/उत्तर पश्चिमी दिशेत चालायला सुरुवात केली आहे. वेदर मॉडेलच्या अनुसार, अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु गुजरात कोस्ट, पुरबंदरच्या जवळ, म्हणजेच द्वारका व ओखाच्या किनार पट्टी जवळून जाण्याची अपेक्षा आहे.
अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु पाण्यात प्रवास करत राहील, तथापि किनारी पट्टीच्या जवळ असल्यामुळे हवामान प्रणालीचा प्रभाव कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या ही हवामान प्रणाली कॅटेगरी २ स्टॉर्म मध्ये आहे. लवकरच कॅटेगरी १ स्टॉर्म मध्ये येण्याची अपेक्षा आहे. तथापि, ह्या हवामान प्रणालीमुळे १३५ ते १४५ किंलोमीटरच्या वेगाने जोरदार वारे वाहतील, असे दिसून येत आहे.
स्कायमेटच्या मतानुसार, चक्रीवादळ वायुला कमकुवत स्टीयरिंग वातावरणाचा सामना करावा लागणार आहे.
कारण ही प्रणाली उत्तर-उत्तरपश्चिम दिशेत वळेल म्हणून, प्रणालीची गती मंद होईल, असे दिसून येत आहे. गुजरातच्या कोस्टला ओलांडल्यानंतर वायुला उत्तर अरब सागरावर एक विपरीत चक्रवाती परिस्थितीचा सामना करावा लागला. परिणामी, कराची कोस्टजवळ प्रणाली स्थिर होऊ शकेल. शक्यता आहे की वायु चक्रीवादळ गुजरात कोस्ट जवळ न धडकून, समुद्रातच कमकुवत होऊ शकतो. तथापि, या सर्व संभाव्यतेसाठी प्रतीक्षा करण्याची आणि पाहण्याची आवश्यकता आहे.
सध्या, चक्रीवादळ वायु अक्षांश १९ अंश सेल्सियस उत्तर आणि रेखांश ६९.९ अंश सेल्सियस पूर्व, मुंबईच्या २६० किलोमीटर पश्चिमेस आणि पोरबंदरच्या ३२० किमी दक्षिणेकडे आहे. ही प्रणाली सुमारे १५ किलोमीटरच्या वेगाने चालत आहे.
चक्रीवादळ वायुची परिधि गुजरातच्या कोस्टपर्यंत पोहोचत आहे. परिणामी सौराष्ट्रच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू झाला आहे. रात्री पर्यंत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.
येणाऱ्या दोन दिवसात, वेरावळ ते ओखा पर्यंत, म्हणजेच द्वारका, जुनागढ, नलीया आणि राजकोट मध्ये जोरदार वेगाने चालण्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्र बदल सांगायचे तर, अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु महाराष्ट्राच्या पुढे निघून गेलेला आहे, ज्यामुळे आज पावसाचा जोर संपूर्ण राज्यात कमी राहील. परंतु, १५ जून रोजी एकदा पुन्हा पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे ज्यामुळे असे म्हणता येईल की मुंबईकरांना आता मॉन्सूनच्या आगमनासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे