[Marathi]अति तीव्र चक्रीवादळ क्यार च्या प्रभावामुळे रत्नागिरी आणि पणजी मध्ये मुसळधार पाऊस

October 26, 2019 12:10 PM | Skymet Weather Team

स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार मध्यम ते मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. स्कायमेटकडील उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार रत्नागिरीत २१ तासांच्या कालावधीत ५५ मिमी आणि सोलापूरमध्ये ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर कोकण आणि गोवा येथे हलक्या सरी पहावयास मिळाल्या. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि डहाणू येथे देखील पावसाळी गतिविधी अनुभवण्यात आल्या.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, अति तीव्र चक्रीवादळ क्यार मध्य-पश्चिम अरबी समुद्रावर सरकले असून ते आणखी पश्चिमेकडे जात आहे.

या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, येत्या २४ तासांत दक्षिण कोकण आणि गोव्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पणजीत एक किंवा दोन मुसळधार सरींसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मागील २१ तासांत गोव्यात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आगामी २४ तासांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी गतिविधी कमी होतील, तथापि, काही भागात अति तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी दिवाळीच्या संध्याकाळी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी एक किंवा दोन मध्यम सरींसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

Image Credits – Times of India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES