[Marathi] हिक्का तीव्र चक्रीवादळात रूपांतरीत झाले असून भारतीय किनारपट्टीपासून आणखी दूर सरकले

September 24, 2019 6:08 PM | Skymet Weather Team

काल तयार झालेल्या चक्रीवादळ हिक्काने आपल्या सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. हवामान प्रारूपांच्या अंदाजानुसार हिक्का वादळ केवळ चक्रीवादळ राहील अशी अपेक्षा करीत होते पण त्याला हुलकावणी दिली.

काल दुपारीच हिक्काचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. किंबहुना, आज वादळाची तीव्रता वाढून त्याचे अति तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून द्वितीय श्रेणी हरिकेनच्या तुल्यबळ आहे.

सध्या, हिक्का २०.१ अंश उत्तर, ६०.९ अंश पूर्व वर केंद्रित असून मासीराह, ओमानच्या पूर्व-दक्षिणपूर्वेस सुमारे २२० किमी आणि डुकमच्या पूर्व ईशान्य दिशेने ३५० किमी अंतरावर आहे.

अरबी समुद्राच्या उत्तरेस प्रतिचक्रवात स्थित असल्यामुळे वादळ पश्चिम-नैऋत्य दिशेने सरकत राहील आणि या काळात अरब द्वीपकल्पावर प्रतिचक्रवाती परिस्थिती उद्भवणे हे या भागाचे नियमित वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे चक्रीवादळाची पश्चिम वायव्येकडील बाजूकडे होणारी हालचाल प्रतिबंधित होत आहे आणि वादळ दक्षिणेकडे ढकलले जात आहे.

दरम्यान आज रात्री हिक्का जमिनीवर धडकणे अपेक्षित आहे आणि सध्या २० किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे. ह्या प्रणालीकरिता भूपृष्ठावरील व खूप उंचीवरून वाहणारे वारे यांच्या वेगातील फरक अनुकूल असून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान देखील जास्त आहे ज्यामुळे जमिनीवर धडकण्यापूर्वी वादळाचे सामर्थ्य टिकवून ठेवण्यास मदत होईल.

तथापि, जमिनीवर धडकण्याच्या वेळी, हिक्का किंचित कमकुवत होईल व चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर ओमान किनारपट्टीच्या समांतर पश्चिम वायव्य दिशेने जाईल आणि चक्रीवादळ म्हणून देशाच्या अंतर्गत भागात जाईल.

चक्रीवादळामुळे ओमानच्या काही भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि अगदी अचानक पूर देखील येवू शकतो. जमिनीवर पोहोचल्यानंतर, २४ तासांच्या आत, हिक्का येमेन, ओमान आणि सौदी अरेबियाकडे जाईल आणि या दोन राष्ट्रांवरही पाऊस देईल.

Image Credits – NDTV

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES