Skymet weather

[Marathi] अति तीव्र चक्रीवादळ बुलबुल पश्चिम बंगालला धडकणार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल मध्ये अतिदक्षतेचा इशारा

November 8, 2019 8:07 PM |

cyclone Bulbul

या हंगामात बंगालच्या उपसागरातील एकमेव चक्रीवादळ बुलबुल मागील ३६ तासांत तीव्रतेत वाढ होऊन अति तीव्र चक्रीवादळ बनले आहे. खरं तर, उबदार समुद्र आणि वातावरणातील दोन थरातील वाऱ्यांच्या वेगातील कमी तफावत यामुळे या प्रणालीची तीव्रता आणखी वाढेल, परंतु किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे ते अत्यंत तीव्र चक्रीवादळ बनणार नाही.

सध्या चक्रीवादळ बल्बुल हे अक्षांश १७.२ अंश उत्तर आणि रेखांश ८७.६ अंश पूर्वच्या आसपास आहे. ओडिशा पारादीपच्या दक्षिण-आग्नेय दिशेला ३५०किमी, सागर बेटे, पश्चिम बंगाल पासून दक्षिण-नैऋत्य दिशेला ४९०किमी आणि खेपुपारा, बांगलादेशच्या दक्षिण-नैऋत्य दिशेला ५९० किमी अंतरावर आहे.

ही प्रणाली आता पुढील १२ तासांत उत्तर-वायव्य दिशेने आणि त्यानंतर उत्तर दिशेने किनाऱ्याचा मागोवा घेईल. उद्या सकाळी म्हणजे ९ नोव्हेंबरपर्यंत बुलबुल हा पारादीपवर असेल, त्यानंतर उत्तर-ईशान्य दिशेला वळसा घालून जाईल. यावेळी, प्रणाली थोडीशी हळू होईल.

Cyclone-Bulbul

हवामानतज्ञांच्या अनुसार, चक्रीवादळ बुलबुल १० नोव्हेंबरच्या पहाटेस सागर बेट, पश्चिम बंगाल आणि खेपुपारा दरम्यान भारत-बांगलादेश सीमेवर धडकण्याची शक्यता आहे. तथापि, बुलबुल जसजसे जमिनीकडे आगेकूच करेल तसतसे कोरडी हवा आणि वातावरणातील दोन थरातील वाऱ्यांच्या वेगातील वाढलेली तफावत यामुळे कमकुवत होण्यास सुरवात करेल परंतु नुकसान करण्याचे पूर्ण सामर्थ्य असण्याची शक्यता आहे.

अत्यंत तीव्र चक्रीवादळ बुलबुल तीव्र चक्रीवादळ वादळ म्हणून धडकण्याची शक्यता आहे. जमिनीवर येण्याच्या वेळी, बुलबुल १००-११० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशात अतिदक्षतेचा इशारा

आज संध्याकाळपासूनच अत्यंत गंभीर चक्रीवादळ बुलबुलचा परिणाम अनुभवण्यास सुरूवात होईल. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

किनारीपासून सुरक्षित अंतर राखत असले तरी, चक्रीवादळ बुलबुल शुक्रवारी संध्याकाळनंतर उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील भागांना प्रभावित करेल. आज रात्री मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून ७०-८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

उद्या सकाळपर्यंत बुलबुल पारादीप आणि किनारपट्टीच्या अगदी जवळ असेल त्यामुळे ९ नोव्हेंबरला पावसाचा जोर कायम राहण्याची अपेक्षा आहे. परिणामी, येत्या २४ तासांत काही अति तीव्र मुसळधार सरींसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीवर जोरदार हजेरी लावेल; त्यात पुरी, चांदबली, बालासोर, पारादीप, भद्रक, जगतसिंगपूर, केंद्रापाडा आणि बारीपाडा यांचा समावेश आहे.

बुलबुल पुढे सरकल्याने १० नोव्हेंबरला ओडिशामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची अपेक्षा आपण बाळगू शकतो, परंतु बल्बुलच्या बाह्य परिघामध्ये असल्यामुळे रविवारीही काही प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या किनारी भागांत ९ व १० नोव्हेंबरला मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसापेक्षा संभाव्य जोराच्या वाऱ्यामुळे अधिक विनाश होण्याची अपेक्षा आहे. दिघा, सागर बेट, उत्तर व दक्षिण २४ परगणा, हुगळी, हावडा, डायमंड हार्बर, कॅनिंग आणि कोलकाता या ठिकाणे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ४८ ते ७२ तासांपर्यंत किनारपट्टीवर मासेमारी पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सखल भागातील स्थानिकांनाही घरातच रहाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

 Image Credits – Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try