[Marathi] मुंबई, पुणे,नागपूर, नाशिक, औरंगाबाद मध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

December 23, 2019 12:13 PM | Skymet Weather Team

दीर्घ काळ कोरड्या हवामाननंतर, आता पाऊस राज्यात परतणार आहे. हवामान प्रारूपं दोन हवामान प्रणालींचे संकेत देत आहेत जे गडगडाटासह विखुरलेला पाऊस देण्यात मदत करतात. राज्यात दुसऱ्यांदा होणाऱ्या अवकाळी पावसाळी गतिविधी आहे.

स्कायमेट अनुसार लक्षद्वीप क्षेत्रापासून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. वाऱ्यांचे संगम क्षेत्र उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विकसित होण्याची शक्यता आहे.

या दोन्ही गतिविधींच्या संयुक्त प्रभावामुळे मुख्यत: मुंबई, पुणे, डहाणू, रत्नागिरी, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला, नागपूर आणि अमरावती या ठिकाणी २४ ते २६डिसेंबर दरम्यान पाऊस हजेरी लावेल अशी अपेक्षा आहे. वास्तविक, विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात आज सायंकाळी पाऊस सुरू होईल आणि काही ठिकाणी तुरळक सरी अनुभवल्या जावू शकतात.

त्याचप्रमाणे लातूर, हिंगोली, जालना आणि बीडसह इतर अनेक शहरांमध्ये तीन दिवसांत तुरळक सरींची तर अहमदनगर, औरंगाबाद आणि महाबळेश्वरमध्ये विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे.

हवामानातील या गतिविधींच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन ते चार दिवस किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, पाऊस थांबल्यानंतर साधारण २७ डिसेंबरपासून उत्तर / ईशान्येकडून वारे वाहू लागल्याने रात्रीच्या तापमानात पुन्हा घट होईल.

Image Credits – Business Standard 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES