फिलिपिन्स आणि चीन दरम्यानच्या दक्षिण चीन समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ विफा च्या तीव्रतेत वाढ होणार नाही परंतु येत्या काही दिवसांत या वादळाच्या प्रभावामुळे भागात पूर आणि स्थानिक पातळीवर वेगवान वाऱ्यांचा धोका संभवतो.
विफा वादळ या आठवड्याच्या शेवटी उत्तर व्हिएतनाममध्ये धडकण्यापूर्वी चीनच्या गुआंग्सी प्रांताच्या किनारपट्टीजवळ पश्चिम-वायव्य दिशेने प्रवास करेल. आग्नेय चीनपासून उत्तरेकडील व्हिएतनाम आणि उत्तर लाओसमधील ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याचा धोका वाढण्याची भीती असून खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून नाविक आणि जलतरणपटूंसाठी धोका निर्माण होईल.
ही कमकुवत प्रणाली येत्या तीन दिवसात म्हणजेच ८ ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागरापर्यंत पोचण्याची शक्यता आहे जिथे आधीच एक चक्रवाती प्रणाली उपस्थित असेल. आमच्या तज्ञांच्या मते, ६ ऑगस्टच्या आसपास या दोन्ही यंत्रणा विलीन होतील आणि मग कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. या हंगामातील हे कदाचित पहिलेच कमी दाबाचे क्षेत्र असेल.
या दरम्यान, ही प्रणाली अधिक बळकट होईल आणि त्यानंतर अंशतः उत्तर बंगालच्या उपसागरात आणि काही प्रमाणात पश्चिम बंगाल आणि ओडिसाकडे जाईल. आम्ही असे म्हणू शकतो की हि प्रणाली व्यापक असेल आणि ह्या प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आणि लगतच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणात चांगला पाऊस पडेल.
ही प्रणाली हळूहळू अंतर्गत भागांत सरकेल त्यावेळी छत्तीसगड, उत्तर झारखंड आणि मध्य प्रदेशात पाऊस पडेल. यासह राजस्थानच्या काही भागात देखील पाऊस होईल आणि दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा राज्यातील काही भागांत पाऊस होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, १० ऑगस्टच्या सुमारास हि प्रणाली गुजरात आणि राजस्थानमध्ये पोहोचेल.
प्रतिमा क्रेडीट: हिंदुस्तान टाइम्स
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे