मुंबईत पावसाने दणक्यात पुनरागमन केले आहे. गेल्या २४ तासांपासून शहरात काही मुसळधार सरी कोसळत आहेत. वस्तुतः कालपासून पाऊस सुरूच असून, मुसळधार पावसामुळे बर्याच भागात पाणी साचले आहे.
खरं तर, स्कायमेटने आधीच वर्तवल्याप्रमाणे, गेल्या २४ तासात शहरात तीन अंकी पावसाने हजेरी लावली असून सांताक्रूझ येथे १३४ मिमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे, कुलाबा येथे ५४ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबई शहरासाठी शनिवारची सुरुवातच पावसाने झाली असून, बर्याच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. खरं तर, आमच्या हवामानातज्ञांनुसार, दिवसभर थोडी विश्रांती घेऊन पाऊस सुरुच राहील. आज देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून तीन अंकी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
उद्या देखील मुंबईत पाऊस पडेल आणि तीन अंकी पावसाची अपेक्षा आहे. शहराच्या बर्याच भागात पाणी साचण्याची समस्या दिसून येणार आहे. खरं तर,
पावसाच्या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या शेवटी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ठरणार आहे.
ऑगस्ट महिन्यात मुंबईत सरासरी ५८५.२ मिमी पाऊस पडतो व आतापर्यंत शहरात १९० मिमी पाऊस झाला आहे. असे दिसते आहे की, येत्या दोन दिवसांतच मुंबईत मासिक पावसाच्या निम्म्याहून अधिक पाऊस नक्कीच होईल.