[Marathi] मुंबईचा तापमानात दिसून आली ७ अंशाची घट

March 28, 2019 5:08 PM | Skymet Weather Team

२५ आणि २६ मार्चला मुंबईत उष्णतेची लाट अनुभवण्यात आली. परंतु, गेल्या २४ तासात स्थितीत सुधारणा दिसून आलेली आहे आणि काल तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. २५ मार्चला पारा ४०.३ अंश सेल्सिअसपर्यन्त पोहोचला. काल कमाल तापमान ३३.३ अंश सेल्सिअस वर नोंदवला गेला. सध्या हवामानाची स्थिती पाहता, तापमान ३३-३४ अंशाचा मध्ये नोंदवला जाईल.

याउलट किमान तापमान गेल्या २४ तासात २२.६ अंशावर नोंदवला गेला आहे.

येणाऱ्या दिवसात मुंबईकरांना उष्णतेची लाटपासून सुटका मिळेल. याशिवाय, तापमानात पण काही काळ लक्षणीय वाढ दिसून येणार नाही. किमान तापमान २२ ते २३ अंशाचा मध्ये नोंदवला जाईल.

तापमानात घट येण्याचे कारण आहे उत्तर पश्चिम दिशेने येणारे वारे. हे वारे पुढील चार ते पांच दिवस मुंबईवर वाहतील, ज्यामुळे तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसचा मध्ये नोंदवला जाईल. एप्रिल ची सुरुवात पण अशीच राहणार आणि तीव्र उष्णतेपासून काही काळ सुटका मिळेल.

पावसा बद्दल सांगायचे तर, मुंबईत जानेवारी ते एप्रिलच्या मध्ये पाऊस पडत नाही. जानेवारी आणि एप्रिल दरम्यान सरासरी पाऊस 0.5 मि.मी.पेक्षा पण कमी आहे.

येणाऱ्या दिवसात पावसाची कोणतीही शक्यता नाही आहे आणि तापमानात काही लक्षणीय वाढ नाही नोंदवली जाणार. म्हणून मुंबई शहरातील हवामान गरम आणि उष्ण राहील व आकाशातील परिस्थिती स्पष्ट राहील.

मुंबईत प्री मान्सूनची सुरवात मे महिन्यात होते व पाऊस जोर जून महिन्यात पकडतो.

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES