यंदा तेलंगाणा राज्यात आतापर्यंत मान्सूनचा पाऊस चांगला झालेला आहे. आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीलाही आतापर्यंत चांगला पाऊस होऊन नेहमीपेक्षा ३१ टक्के जास्त नोंद झालेली आहे. तसेच रायलसीमा येथे मात्र जास्त पाऊस झालेला नसून आतापर्यंत तेथे ३२ टक्के पावसाची तुट निर्माण झाली आहे. आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीला पावसाची उघडझाप जरी चालू असली तरी रायलसीमा मात्र अद्यापपर्यंत कोरडाच आहे.
सध्यस्थितीत ओडिशाच्या किनारपट्टीजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने आंध्रप्रदेशाची किनारपट्टी आणि ओडिशा येथे व्यापक पाऊस होतो आहे. तसेच रायलसीमा येथे मात्र अजिबातच पाऊस नाही. वास्तविक बघता जुलैच्या उर्वरित काळातही या भागात चांगला पाऊस होणे अपेक्षित नसल्याने हा भाग आता दुष्काळाच्या छायेत जाण्याची शक्यता आहे. कारण यंदा या काळात उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेश या भागांवर एकही हवामान प्रणाली तयार झालेली नाही, या हवामान प्रणालींमुळे रायलसीमा येथे पाऊस होत असतो.
सध्या बंगालच्या उपसागरात मध्य-पश्चीमेकडे आणि तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ एक चक्रवाती हवेचे क्षेत्र तयार होताना दिसून आले आहे.
सध्यस्थितीत मान्सूनच्या लाटेचा पट्ट्याचा प्रभाव आंध्रप्रदेशापासून ते तामिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत होत आहे. त्यामुळे येत्या २-३ दिवसात आंध्रप्रदेशाची किनारपट्टी आणि तेलंगाणा या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे अपेक्षित आहे. रायलसीमा येथेही तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. जून मध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी या भागात खरीप पिकांची जी पेरणी केली होती त्यांच्या साठी हा पाऊस खूपच चांगला आहे.
आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील हवामान
हवामानात हवा तसा बदल न झाल्यामुळे आंध्रप्रदेशाच्या बऱ्याच भागात कमाल तापमान हे ५ ते ६ अंश से. ने जास्त आहे. पण आता होणाऱ्या या पावसामुळे येथील कमाल तापमानात घट होऊन ते सामान्य पातळीला नक्कीच येईल.
गेल्या २४ तासात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे चांगलाच व्यापक पाऊस झालेला आहे. हैदराबाद येथे ३१ मिमी, नेल्लोर आणि विजयवाडा येथे ३८ मिमी किकानाडा येथे १७ मिमी आणि अनंतपुर येथे २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Image Courtesy: deccanchronicle.com