काल अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिमी किनारपट्टी, कर्नाटक, दक्षिणी महाराष्ट्र व गोवा येथे जोरदार वृष्टी झाली. परंतु याच प्रणालीमुळे केरळात मान्सूनचे आगमन होऊनही तुरळक पाऊस झाला. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचे “अशोभा” नावाच्या चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.
या प्रणालीमुळे पश्चिम किनारपट्टीवर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरणासह पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्कायमेट या संस्थेतील हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ पुढे वायव्येकडे सरकणार असून त्यामुळे कर्नाटक, कोकण आणि केरळ येथे येत २४ तासात पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी व गुजरात येथे येत्या २४ तासात तुरळक पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वारे पश्चिम किनारपट्टीवरून वरील भागात शिरत असल्याने या भागात गडगडाटासह वाढली पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासात पश्चिम किनारपट्टीवर झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे