[Marathi] परभणी, रत्नागिरी, नागपूर, अकोला, कोल्हापूरमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता; काढलेली धान्य सुरक्षित ठिकाणी साठवावी.

May 31, 2018 3:30 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील बहुतेक भाग, खासकरुन विदर्भमधे अजुनही उष्णता खूप आहे ,तथापि, मध्य महाराष्ट्रच्या सर्व भागातुन तीने माघार घेतली आहे.

दक्षिण कोकणच्या काही भागात माञ हलकासा पाऊस झाला आहे. बुधवारी चंद्रपूरमध्ये सर्वात जास्त कमाल तापमान ४७. ९ अंश एवढे नोंदविले गेले, त्याखालोखाल ब्रम्हपुरी येथे ४६. ९ अंश, वर्धा ४५. ७ अंश ,गोंदिया ४४. ५ अंश अशी नोंद झाली.

तथापि, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकण भागातील तापमान सध्या कमी झाले आहे कारण याठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळी ०८. ३० पासुन पुढील २४ तासात ब्रह्मपुरी येथे ७ मिमी पाऊस, चंद्रपूर ५ मिमी, गोंदिया १ मि.मी., नागपूर ०.५ मिमी, सांगली ०.४ मिमी, रत्नागिरी ०.२ मिमी आणि सोलापूर येथे पावसाची ०.२ मिमी एवढी नोंद झाली आहे.विदर्भातील बहुतांश भागात उष्णता कमी होऊन तेथील कमाल तापमान पण कमी होईल अशी अपेक्षा आहे.

[yuzo_related]

कमी दाबाच्या पट्टयांमुळे निर्माण झालेले वारे सध्या उत्तर-पूर्व राजस्तानकडून येऊन विदर्भ ओलांडून तेलंगणाकडे आगेकूच करत आहे, त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

परभणी, लातूर, नांदेड, चंद्रपूर, वाशिम, वर्धा, अकोला, नागपूर, हिंगोली, सांगली, सातारा, कोल्हापूर व गोंदिया यांचा त्यामध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त, कोकण मधील काही भागातील पाऊस कमी होऊ शकतो तर दक्षिण कोकण मध्ये माञ पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील येत्या १ ते २ दिवसात ढगांच्या गडगडातीसह पाऊस होऊ शकतो.

उत्तर किनार्यावरील महाराष्ट्र त्यामधे मुंबईचा पन समावेश होतो येथे ३ जुनं पासून मौसमी पाऊस येईल अशी शक्यता आहे ,तोपर्यंत तुरळक व हलकासा पाऊस होईल.

हवामानाचा कृषी घटकावर होणारा परीणाम पाहु;

ज्या ठिकाणी अजूनही उष्णता जास्ती आहे तेथील शेतकरी बंधूनी पिकांना पानी दयावे . जमिनीतील पानी साचून राहावे म्हणून मल्चिंग करावे. दक्षिण कोकणातील शेतकरी मित्रांनी तांदूळ व नाचणी पिकांची पेरणीची तयारी करावी. आंबे राहिलेले सकाळी किंवा संद्याकाळी काढून घ्यावेत. माती परीक्षण करावे. उन्हाळी पिकांची काढणी संपवावी.

Image Credit: Goibibo.com

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.  

 

OTHER LATEST STORIES