नैऋत्य मान्सूनने सोमवारी सलग चौथ्या दिवशी देशातून परतीचा प्रवास सुरू ठेवला. सर्वात जलद म्हणजेच अवघ्या चार दिवसात बहुतांश भागातून पाऊस ओसरला आहे.
ताज्या माहितीनुसार, मान्सून आता पश्चिमेकडील मुंबई आणि पूर्वेकडील कोलकाता ह्या मोठ्या शहरातून परतला आहे. यामुळे, आता दोन्ही शहरांमध्ये हवामानाची परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून हवामान गरम होण्याची अपेक्षा असून स्थानिक वातावरणातील घडामोडींमुळे तुरळक सरींची शक्यता आहे.
नैऋत्य मॉन्सून आता संपूर्ण गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उप-हिमालयीय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि संपूर्ण ईशान्य भारतातून परतला आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, दक्षिण भारतातील काही भाग, छत्तीसगडचा आणखी काही भाग, ओडिशाचा काही भाग आणि गंगा पश्चिम बंगाल येथून देखील परतला आहे.
आता परतीची रेषा डायमंड हार्बर, बांग्रीपोशी, सुंदरगड, धमतरी, रामागुंडम, नांदेड, अलिबाग मधून जात आहे. तसेच, येत्या २४ ते ४८ तासांत देशातील उर्वरित भागातून मान्सून परतण्यास हवामानाची परिस्थिती अनुकूल राहील.
सामान्यत: मानसूनच्या परतीचा अभ्यास १५° उत्तर पर्यंत म्हणजेच पश्चिम किनारपट्टीवरील गोवा आणि पूर्व किनारपट्टीवरील मछलीपट्टनम पर्यंत केला जातो. त्यानंतर, भारताच्या वायव्य आणि मध्य भागातून मान्सून परतल्यास ईशान्य मान्सूनच्या लवकरच आगमनास वातावरण पोषक होते.
दक्षिण द्वीपकल्पात वाऱ्यांची दिशा बदललेली असून आधी पश्चिमेकडून येणार वारे आता पूर्वे कडून येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात वेग वाढण्याची देखील शक्यता आहे.
Image Credits – Holidify
Any information taken from here should be credited to Skymet Weather