या वर्षी मान्सूनमध्ये जून मध्ये खूपच चांगला पाऊस झाला पण जुलै आणि ऑगस्ट मध्ये आत्तापर्यंत ठीकठाक पाऊस झाला. मागील आठवड्यात तर मान्सूनने थोडी विश्रांतीच घेतली. त्यामुळे भारतभर चालेला पाऊस थांबून गेला व पावसाच्या तुटीचा आकडा ९% वरून १०% वर गेला. परंतु स्कायमेटमधील हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात नैऋत्य मान्सून पुन्हा सक्रिय होईल व मध्य व पूर्व भारतावर पुन्हा पाऊस सुरु होईल.
पुढील दोन दिवसात भारतावर कोणतीही हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता नसल्याने मान्सूनचा पाऊस होणार नाही. त्यानंतर या आठवड्यातील पुढील दिवसात बंगालच्या उपसागरात एक कमीदाबाचे क्षेत्र तयार होताना दिसून येत आहे. नंतरच्या २-३ दिवसात हे कमी दाबाचे क्षेत्र भारतावर येईल. या प्रणाली मुळे पश्चिमबंगाल, ओडिशाची किनारपट्टी मध्यप्रदेश व महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे.
या कमीदाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे भारताच्या दक्षिणेकडिल भागावर सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे. होणारा पाऊस मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा होईल त्यामुळे १०% वर अडकलेला पावसाचा तुटीचा आकडा थोडा कमी होण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा आत्तापर्यंतचा प्रवास
नैऋत्य मान्सून ने १६ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस दिल्यामुळे पाच दिवस देशभरातील पावसाच्या तुटवड्याचा आकडा ९% च्या आसपास राहिला. त्या नंतर पावसाचे प्रमाण कमी झाले व त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले असून आतापर्यंत देशभरातील पावसाचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा निम्म्याने कमी आहे. येते दोन दिवस तरी अशीच परिस्थिती राहील. १६ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान ज्या भागात पाऊस झाला फक्त त्या भागाची पावसाची टक्केवारी सामान्य टक्केवारी पेक्षा ५ ते ६ पटीने जास्त होती.
१ जून पासून ते २३ ऑगस्ट पर्यंत देशभरात ५८९.६ मिमी पाऊस झाला असून साधारणतः दरवर्षी या काळात ६५५.६ मिमी पाऊस होतो. ७३% भागातील २४ उपभागात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे.
Image Credits: ft.com