नैऋत्य मान्सूनच्या आगमनानंतर संपूर्ण जून महिन्यात भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडील भागात जोमदार पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच कर्नाटक, कोकण आणि गोवा या भागात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. या भागातील पाऊस ज्या महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो त्या पुढीलप्रमाणे
मान्सून प्रणाली
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात ज्या हवामान प्रणाली तयार होतात त्यातून मान्सूनची निर्मिती होत असते. आणि त्यामुळे मान्सूनची लाट तयार होते, आणि सर्वात आधी पश्चिम किनारपट्टीच या लाटेचा सामना करते आणि म्हणूनच या भागात जास्त पाऊस होतो.
मान्सून मध्ये तयार होणारा कमी दाबाचा पट्टा
समुद्रात तयार झालेल्या हवामान प्रणालीचा प्रभाव किनारपट्टीजवळील गुजरात पासून केरळ पर्यंत होत असतो. या प्रभावामुळे होनावर आणि मंगरूळ सारख्या भागात जून महिन्यात १००० मिमी पाऊस होतो. होनावर आणि मंगरूळ येथील जून महिन्यातील पावसाची सरासरी अनुक्रमे १०३३ मिमी आणि १०४५ मिमी असते. साधारणपणे अशी नोंद होण्यासाठी या भागात रोजच चांगला पाऊस झाला पाहिजे.
या भागात ५ जूनलाच मान्सूनचे आगमन झाले असून येथे जोमदार पाऊसही होत आहे पण तरीही जूनचा अर्धा महिना संपला असून आतापर्यंत सरासरीपेक्षा काहीसा कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत होनावर येथे ३८० मिमी आणि मंगरूळ येथे ३९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा अंदाज
याआधीच आपण बघितले कि कर्नाटकाची किनारपट्टी, कोकण आणि गोवा या भागात होणाऱ्या पावसात मान्सून प्रणालीच भर घालत असतात. सध्या बंगालच्या उपसागरात अशीच मान्सून प्रणाली तयार होत असून त्यामुळे या भागात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होऊन या पावसाची नोंद तीन आकड्यात होऊ शकते. तसेच पश्चिम किनारपट्टीजवळ देखील प्रणाली प्रभावी झाली असून तेथेही चांगल्या पावसाची शक्यता आहे.
१३ जून २०१५ पासून कर्नाटक, कोकण आणि गोवा या भागात झालेल्या पावसाची नोंद (मिलिमीटर) पुढील प्रमाणे
Image credit- pixfocus.com