[Marathi] नैऋत्यमान्सून सर्व अडथळे पार करत जोमाने सक्रीय

June 15, 2015 4:46 PM | Skymet Weather Team

 

या वर्षी नैऋत्य मान्सून येण्या आधीपासूनच चांगला नसेल अशी एकीकडे चर्चा सुरु असतानाच मान्सून अनपेक्षितपणे अरबी समुद्रात निर्माण झालेले अशोबा चक्रीवादळासारखे अडथळे पार करत पुन्हा पूर्ववत वेगाने सक्रीय झाला आहे अशी माहिती भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने दिली आहे.

केरळात मान्सूनचे आगमन साधारणपणे ५ जूनला होणार होते ते आठवडाभर उशिरा झाले आणि त्यातच अरबी समुद्रातील अशोबा या चक्रीवादळाने मान्सूनसाठी पूरक असणारी समुद्रातील आर्द्रता कमी झाली आणि हि आर्द्रता हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने घेऊन गेले. यामुळेच मान्सूनचे पश्चिम किनारपट्टी आणि द्वीपकल्पाच्या भागात आगमन होऊनही हवा तसा पाऊस किंवा प्रगती झाली नाही.

या थोड्या काळाच्या शिथिलतेनंतर ११ जून ला पश्चिम किनारपट्टीला मान्सूनची मोठी लाट आली आणि मान्सूनची पुन्हा वेगाने प्रगती सुरु झाली.

नैऋत्य मान्सून आता गुजरात, कोकणाचा बराचसा भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, रायलसीमा, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेसहाच्या किनारपट्टीचा भाग येथे प्रभावी झालेला आहे.

२०१५ मधील नैऋत्य मान्सून सध्या पश्चिम मध्य प्रदेशात प्रभावी आहे पण दरवर्षी मान्सून आधी पूर्व मध्यप्रदेशात दाखल होत असतो.

मान्सूनच्या उत्तरेकडील प्रवासात, मान्सून आधी केरळात दाखल होतो आणि नंतर पश्चिम किनारपट्टीकडून मुंबईत पोहचतो. त्यानंतर भारताच्या द्वीपकल्पाचा भाग व्यापला जातो यात साधारपणे स्कायमेट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणी द्वीपकल्पाबरोबरच कर्नाटकाची किनारपट्टी तसेच आतील भाग आणि आंध्रप्रदेश व महाराष्ट्र यांचा समावेश असतो.

गुजरात आणि सौराष्ट्रात मान्सून साधारणपणे आगमनानंतर दोन आठवड्यात दाखल होतो पण यंदा २०१५ चा मान्सून नऊ दिवसांनीच दाखल होण्याची शक्यता आहे.

द्वीपकल्प आणि महाराष्ट्रात आतापर्यंत नैऋत्य मान्सूनचा पाऊस व्यापक आणि सारख्याच प्रमाणात झाला आहे. गेल्या २४ तासात छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल मध्ये चांगला आणि व्यापक पाऊस झाला आहे.

स्कायमेट नुसार नैऋत्य मान्सून आता वेग घेत असून त्याचा प्रभाव वाढून तो आधीच्या ठरलेल्या तारखांना उरलेल्या भागात दाखल होईल असा अंदाज आहे. तसेच मध्य भारत आणि पूर्व भारतातही लवकरच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

Image Credits: www.phaidon.com

OTHER LATEST STORIES