आता आपण नैऋत्य मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. या महिन्याचा सरासरी पाऊस १७३.५ मिमी होईल असा अंदाज आहे. हि नोंद सर्वाधिक पाऊस ज्या महिन्यात होतो म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट पेक्षा फारच कमी आहे. या महिन्यात कसा पाऊस होईल हे सांगणे फारच बिकट असते कारण या महिन्यात रोज होणाऱ्या पावसाचे प्रमाण अगदीच कमी झालेले असते.
सर्वसाधारणपणे मान्सून दिल्ली आणि एनसीआर या भागातून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काढता पाय घेताना दिसून येतो. तसेच पश्चिम राजस्थानातुनही १ सप्टेंबर शिवाय मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होत नाही. आणि हा संपूर्ण महिना द्वीपकल्पाचा भाग, पूर्व आणि ईशान्य भारतात मात्र नैऋत्य मान्सून सक्रीय असतो.
सांखिकी दृष्ट्या सप्टेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात बऱ्याच हवामान प्रणालींचा प्रवेश होताना दिसून येतो. तसेच मान्सूनने त्याच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केल्या बरोबरच रोजच्या होणाऱ्या पावसाच्या नोंद कमी होण्यास सुरुवात होते. महिन्याच्या सुरुवातीला रोजचा सरासरी पाऊस ७ मिमी असेल तर महिन्याच्या मध्याला ६ मिमि होतो आणि महिन्याच्या शेवटी ५ मिमी पर्यंत कमी होताना दिसून येतो.
ऑगस्ट महिन्याचा मान्सूनचा पाऊस जुलै महिन्यापेक्षा कमी झाला. महिन्याचा शेवट सरासरीपेक्षा २३% कमी पावसाने झाला. संपूर्ण महिन्याभरात फक्त ७ दिवसच दिवसाच्या सरसरी पावसापेक्षा साधारण किवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळेच या महिन्यात पावसाची कमतरता जास्तच वाढत गेली.
ईशान्य भारतात सप्टेंबर महिन्यात होणारा पाऊस
या महिन्यात सर्वसाधारणपणे ईशान्य भारतात एकतर खूप जोरदार पाऊस होतो नाहीतर वातावरण एकदम निष्क्रिय तरी असतो. जर जोरदार पाऊस झालाच ता मात्र दैनंदिन पावसाची सरासरी नोंद हि तीन आकडी पण होऊ शकते. आपण २०१४ मध्ये झालेल्या जोरदार पावसाची नोंद बघू या, या झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण भारताच्या पावसाच्या आकडेवारीत कमालीची वाढ झाली होती. १७% पावसाची उणीव हि मान्सून संपेपर्यंत चक्क १२% झाली होती.
ईशान्य भारतात झालेल्या पावसामुळे संपूर्ण आकडेवारीत फेरबदल होण्याची ताकद नक्कीच असते. यंदाही या महिन्याची सुरुवात ईशान्य भारतात जोरदार पावसाने झाली आहे.
Image Credits: www.indiaspend.com