पश्चिमी किनारपट्टीला नैऋत्य मान्सून सक्रीय झाला असून किनारपट्टीजवळील भागात जोरदार वृष्टी होते आहे. मुख्यत्वे कोकण, गोवा आणि कर्नाटकाची किनारपट्टी या भागात मुसळधार ते जोरदार पाऊस होतो आहे.
हा पाऊस असाच सुरु राहील फक्त या पावसाची तीव्रता वेळोवेळी बदलत राहील. भारतातील स्कायमेट या संस्थेतील हवामान विभागानुसार पश्चिम किनारपट्टीला तयार झालेला कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव दक्षिण गुजरात पासून केरळ पर्यंत होत असून अजून काही काळ असाच पाऊस सुरु राहील. या अर्धस्थायी मान्सून प्रणालीमुळे या भागात जोरदार पाऊस सुरु आहे.
बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात पश्चिम किनारपट्टीच्या भागात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
मान्सूनच्या पावसासाठी आवश्यक असणारे कमी दाबाचे क्षेत्र
स्कायमेट या संस्थेनुसार सध्या दोन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले असून या दोन प्रणाली मान्सूनचा पाऊस नियंत्रित करत आहे, त्यातील एक म्हणजे पश्चिमी किनारपट्टीजवळ आहे आणि दुसऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राजस्थानातील गंगानगर पासून ते कलकत्ता आणि बंगालच्या उपसागरापर्यंत होताना दिसून आला आहे.
ह्या दोन्ही प्रणाली अर्धस्थायी प्रकारच्या असून मान्सूनच्या काळात पहिल्या प्रणालीमुळे पश्चिमी किनारपट्टीजवळील भागात पाऊस होतो तर दुसऱ्या प्रणालीमुळे गंगेच्या खोऱ्यात पाऊस होतो. ह्या प्रणालींचा प्रभाव हजारो किलोमीटर पर्यंत होत असतो आणि या प्रणालीच्या लहरींमध्ये खाली आणि वर होण्याची क्षमताही असते. किनारपट्टीजवळील कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असते आणि मान्सून प्रणाली उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणे कडून उत्तरेकडे सरकत असते.
Image Credit: The Hindu