Skymet weather

[Marathi] गुजरातमध्ये दिवसाचे तापमान किंचित कमी होण्यास सुरुवात

May 22, 2015 5:17 PM |

Heat in Gujaratगुजरात साठी नेहमीच मे महिना हा रणरणत्या उन्हाचा तसेच उष्णतेचा असतो आणि त्यामुळेच या काळात येथील तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन भिडते. याबरोबरच येथे उष्ण लहरीचा तडाखाही नेहमीच बसतो. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेले काही दिवस गुजरात मधिल जनता उष्ण लहरीचा सामना करत होती पण आता परिस्थितीत थोडीशी सुधारणा होताना दिसते आहे कारण या उष्ण लहरीने आता आपला मोर्चा मध्यप्रदेश, विदर्भ आणि तेलंगाणाच्या दिशेला वळविला आहे.

हवामानाच्या अभ्यासासाठी जी मॉडेल्स वापरली जातात त्यानुसार गुजरातवर सध्या नैऋत्य दिशेकडून येणारे वारे वाहत असून येत्या २४ तासात त्यांची तीव्रता अधिकच वाढेल. हे येणारे वारे अरबी समुद्रावरून येत असल्याने त्यात थोडा गारवा हा असतोच आणि त्यामुळे येथील वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते.

येत्या २४ तासात या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे तापमानात घट होऊन ते सामान्य पातळीवर येऊन स्थिरावेल. आताही तापमानात थोड्या अंशी घट होण्यास सुरुवात झालेली आहे. उदाहरणादाखल आपण गुजरातमधील काही शहरांचे तापमान बघूया. अहमदाबाद येथे १६ मे २०१५ ला कमाल तापमानाची नोंद ४४.६ अंश से. करण्यात आली होती पण २१ मे म्हणजे काल तेथील कमाल तापमान ४३.३ अंश से. तसेच भूज येथेही १६ मे रोजी कमाल तापमान ४३.४ अंश से. होते तर २१ मे ला ४१.२ अंश से. कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, आणि राजकोट येथेही २१ मे रोजी ४३.३ अंश से. तापमानाची नोंद झाली असून येथेही १६ मे ला ४४.४ अंश से. तापमान होते. यावरून असे स्पष्ट होते कि कमाल तापमानात किंचित का असे ना पण घट होण्यास सुरुवात झालेली आहे.

येत्या दोन दिवसात नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे कमाल तापमानात अजून थोडीशी घट होईल. आताच्या तळपत्या उन्हात तापमानातील थोडीशी घट सुद्धा घाम काढणाऱ्या असह्य उकाड्यापासून दिलासा देते.

For more updates on Monsoon and Monsoon related stories, click here.

image credit - India TV

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try