[Marathi] २०१५ मधील मान्सूनचा सुधारीत अंदाज

July 31, 2015 4:20 PM | Skymet Weather Team

जून मधील पाऊस सामान्य पातळीपेक्षा १६% जास्त असतानाच जुलै महिन्यात मात्र १५% कमी पाऊस झाला आहे हा आकडा जरी सामान्य पातळी जवळ आहे आमचा अंदाज मात्र जुलै महिन्यात ४% पाऊस जास्त होईल असा होता. आजपर्यंत जून-जुलै चा (४५२ मिमी) मान्सूनचा आढावा घेतल्यास, आतापर्यंत मान्सूनचा पाऊस सामान्य पातळीला आहे म्हणजेच ९६% असून आम्ही वर्तविल्यानुसार आतापर्यंत अर्धा टप्पा पार केलेला आहे. आतापर्यंत जुलै महिन्यात मध्य भारत, उत्तर आणि पूर्व भारतात चांगला पाऊस झालेला असून दक्षिणी द्वीपकल्पाला मात्र फारसा पाऊस झालेला नाही. गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०१४ च्या जुलै महिन्यावर ओझरती नजर टाकूया, गेल्या वर्षी जुलै महिन्या अखेरपर्यंत –२२% पाऊस झाला होता त्यात १९ उपभागात कमी पाऊस आणि १७ उपभागात सामान्य पाऊस झाला होता आणि एकही भागात जास्त पाऊस झालेला नव्हता. यंदा मात्र ६ भागात खूप जास्त पाऊस, १७ भागात सामान्य पाऊस आणि १३ भागात कमी पाऊस झालेला आहे.

जुलै महिन्यात कमी झालेल्या पावसाची दाखल घेऊन अंदाज व ऑगस्ट आणि सप्टेबर महिन्याचा अंदाज घेऊन आम्ही आधी दिलेल्या मान्सूनच्या अंदाजाबाबत सुधारणा करत आहोत. एप्रिल महिन्यात आम्ही १०२% (+/-४ कमी जास्त) पाऊस होईल असा अंदाज दिलं होता आता त्यात सुधारणा करून ९८% पाऊस होईल असे जाहीर करत आहोत. त्यातही ६३% सामान्य पावसाची शक्यता, ३५% सामन्यापेक्षा कमी पावसाची शक्याता आणि २% दुष्काळाची शक्यता आहे. एकंदरीत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनुक्रमे ९२% आणि ११२% पाऊस होईल असा अंदाज आहे यातही +/-९ % कमी जास्त होऊ शकते.


 

ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाचा मोठा टप्पा पहिल्या पंधरवड्यात पूर्ण होईल. १५ ते २० ऑगस्ट दरम्यान पाऊस एक छोटीशी विश्रांती घेईल असे अपेक्षित आहे तसेच २० ते २४ ऑगस्ट दरम्यान पुन्हा पकड घेईल कारण महिना अखेरीस एक छोटेसे चक्रवाती अभिसरण अपेक्षित आहे. द्वीपकल्पाला मात्र कमी पावसाची भीती कायम राहील. भारतातील उत्तर कर्नाटक, मराठवाडा आणि रायलसीमा या भागात अतिशय खुप कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीला सुद्धा फारसा पाऊस होणे अपेक्षित नाही आणि त्यामुळे कोकण,मुंबई आणि केरळ यावर त्याचा परिणाम होईल.

जून महिन्यात चांगला पाऊस होण्यासाठी मेडन जुलियन ऑसिलेशन (MJO) ची मदत झाली होती मात्र २८ जून नंतर हे सुद्धा विरुद्ध क्षेत्रात गेले आणि त्याबरोबरच पश्चिम प्रशांत सागरात एका पाठोपाठ एक अशी नेहमीपेक्षा जास्त चक्रीवादळे निर्माण झाली आणि त्यामुळे हिंदी महासागरातील आर्द्रता खेचली गेली. मेडन जुलियन ऑसिलेशन (MJO) सध्या अनियमित आहे. यावरून आमचा असा अंदाज आहे कि ऑगस्ट महिन्यात MJO चा वाईट परिणाम नक्कीच होणार नाही आणि सप्टेंबर महिन्यावर याचा प्रभाव चांगला असेल.

एल निनो सध्या सशक्त असून आम्ही आमच्या अंदाजात त्याचे घटक लक्षात घेतले आहेत. मागील एका आठवड्यात एलनिनो च्या साप्ताहिक निर्देशांकात झालेली घट दिसून येत आहे. एलनिनोची वेगवेगळी क्षेत्रे बघता निनो ३, २.३ अंश से. वरून २.१ अंश से. झालेला आहे, निनो १.२ सुद्धा ०.६ अंश से. कमी होऊन २.९ अंश से. झाला आहे आणि निनो ३.४ ही १.७ अंश से. वरून कमी होऊन १.६ अंश से. झाला आहे. सर्वसाधारणपणे एल निनो च्या प्रभावामुळे उत्तर भारत आणि वायव्येकडील भारतात कमी पाऊस होतो आणि द्वीपकल्पाला सामान्य किंवा जास्त पाऊस होतो. २०१५ साल हे वेगळेच आहे कारण यंदा अगदी उलटा परिणाम झालेला दिसतोय कारण यंदा उत्तर आणि वायव्येकडील भारतात चांगला पाऊस होतो आहे आणि द्वीपकल्पाला मात्र अगदीच कमी पाऊस झालेला आहे.

हिंदी महासागरातील द्विधृव (IOD) आता तरी उदासीन आहे परंतु ऑगस्ट महिन्यात सक्रीय होणे अपेक्षित आहे आणि हि बाब मान्सूनसाठी पूरकच ठरेल.

पिकांचा आढावा

जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्या पर्यंत मागीलवर्षी ५५०.४२ लाख हेक्टर एवढी पेरणी झाली होती. यावर्षी ठी १४३.४ हेक्टरने वाढून ६९३.८ लाख हेक्टर एवढी झाली आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशात यंदा मान्सूनचा चांगला पाऊस झालेला असल्याने तेथील खरीप पिकांना म्हणजेच मुग. उडीद, तेलबिया – सोयाबीन, भुईमुग, तीळ तसेच कडधान्ये यासठी उत्तम आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात झालेल्या कमी पावसामुळे पिकांच्या पेरणीवर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस अपेक्षित असल्याने अजूनही पेरणी साठी एक पर्याय उघडा आहे. बऱ्याच खरीप पिंकांची लागवड होऊन ते आता वाढत असून आता फुले येण्याच्या स्थितीत आहेत. ऑगस्ट मध्ये होणाऱ्या पावसामुळे या पिकांना चांगला बहार येईल आणि सप्टेंबर महिन्यातील पंधरवड्यात येणारा पाऊस पूरक ठरेल असा अंदाज आहे. भातशेतीचेही एकरी प्रमाण २०१४ (१७६.५३ लाख हेक्टर ) पेक्षा १२ % नि वाढलेले असून २०१५ मध्ये १८८.५२ लाख हेक्टर झाले आहे. जुलै महिन्यातील आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होणारा पाऊस भातशेती साठी फायद्याचा असेल. तसेच कापसाच्या शेतीचेही प्रमाण २०१४ (७६.१३ लाख हेक्टर) पेक्षा २३ टक्क्यांनी वाढलेले असून २०१५ मध्ये ९९.५२ लाख हेक्टर झाले आहे. जुलै महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात झालेला पाऊस डाळींसाठी फायद्याचा असून त्याचेही एकरी प्रमाण २०१४ (४८.२२ लाख हेक्टर) पेक्षा २४.४ टक्क्यांनी वाढले असून २०१५ मध्ये ७२.६४ लाख हेक्टर झाले आहे. तेलबियांचेही एकरी प्रमाण २०१४ (१०७.८४ लाख हेक्टर) ३५ % जास्त झाले असून २०१५ मध्ये १४३.०२ लाख हेक्टर झाले आहे. तसेच सोयाबीनचेही एकरी लागवड वाढलेली असून २०१४ (७७.७७ लाख हेक्टर ) पेक्षा २७.०४ टक्क्यांनी वाढलेले आहे. तसेच भुईमुग आणि तीळ लागवाडीचे आहे.

सर्वात जास्त वाढ डाळींच्या पेरणीत म्हणजेच ४८.५ टक्क्यांनी झालेली आहे. २०१४ मध्ये ८७.१८ लाख हेक्टर होते ते २०१५ मध्ये १३५.७७ लाख हेक्टर झाले. तसेच ज्वारी, बाजरी आणि मका हि पिके देखील चांगली होणाची शक्यता आहे.

(हा लेख स्कायमेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जतीन सिंग यांच्या या उताऱ्याचे भाषांतर आहे.)

Featured Image Credit: trekearth.com

 

 

OTHER LATEST STORIES