स्कायमेट, भारतातील अग्रगण्य हवामान अंदाज आणि कृषी जोखीम उपाययोजना कंपनीने २०१९ साठी मॉन्सूनचा प्रारंभिक अंदाज मांडला आहे. स्कायमेटला आगामी मॉन्सूनचा हंगाम 'सामान्य' राहण्याची ५०% अपेक्षा आहे.
स्कायमेट २०१२ पासून मॉन्सूनचा यशस्वीरित्या अंदाज लावत आहे आणि यावर्षी देखील २०१९ करीता संभाव्यतेबद्दलचा अहवाल तयार करून प्रसिद्ध करण्यासाठी कटीबद्ध आहे. तथापि, अद्याप माहिती संकलन आणि एकत्रीकरण सुरु असल्यामुळे संपूर्ण तपशीलवार अहवाल येण्यास थोडा अवकाश आहे. दरवर्षी १५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान स्कायमेट मॉन्सूनचा तपशीलवार अंदाज व्यक्त करते आणि यावर्षी देखील संस्थेतर्फे मॉन्सूनचा अंदाज या काळात देण्यात येईल.
तथापि, मॉन्सूनच्या आरोग्यावर विविध वातावरणीय घटकांचा प्रभाव पडतो. तसेच अलीकडील काळात अल निनोचा मॉन्सूनच्या पावसावर परिणाम अनुभवण्यात आलेला आहे. यावेळी देखील, अल निनो भारतीय मान्सूनच्या संदर्भातील बातम्यांमध्ये आघाडीवर आहे.
अल निनो मध्ये डिसेंबर पर्यंत वाढ दिसून आली होती, त्यानंतर मात्र सतत घट दिसून येत आहे. प्रारंभिक संकेतांनुसार, हे वर्ष अल निनोचा प्रभाव ओसरणारे राहणार आहे. याचा एकंदरीत कल असे दर्शवतो कि या वर्षी दुष्काळ पडणार नसून चांगला पाऊस अपेक्षित आहे. हे सामान्य मॉन्सूनचे वर्ष असू शकते परंतु पावसाची सुरुवात मंद गतीने होऊ शकते. प्रारंभिक नोंदी काही भागांमध्ये जोखमींचे सूचक आहेत.
स्कायमेट हवामानचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले, “गेल्या डिसेंबरपर्यंत पॅसिफिक महासागरात अल नीनोची स्थिती वाढत होती. तथापि आता तापमान कमी होत आहे आणि अल निनोची शक्यताही कमी होत आहे. ही शक्यता मॉन्सूनच्या आगमनानंतर हळूहळू घटून ५०% होईल आणि त्यानंतर पॅसिफिक महासागराच्या तापमानात घट होत राहील. याचा अर्थ असा आहे की हे वर्ष अल निनोचा प्रभाव ओसरणारे राहणार. "