[Marathi] स्कायमेटचे एमडी जतिनसिंग, हवामान विभागाच्या मान्सूनच्या अद्ययावत अंदाजातील मतितार्थ

August 3, 2019 3:06 PM | Skymet Weather Team

यावर्षी १५ एप्रिल २०१९ रोजी, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मान्सून हंगामाकरीता संख्यात्मक अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार, यावर्षी हंगामी पाऊस (+/- ५% च्या प्रारूपातील त्रुटीसह) दीर्घकालीन सरासरीच्या ९६% टक्के राहणार असे जाहीर करण्यात आले होते. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून हंगामात संपूर्ण देशासाठी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८८७ मिमी आहे. दरम्यान ३१ मे २०१९ रोजी हंगामाबद्दल त्यांच्या लांब पल्ल्याचा अद्ययावत अंदाजात आयएमडीने पूर्वीचा ९६ टक्क्यांचा अंदाज कायम ठेवला होता आणि प्रारूपाची त्रुटी +/- ४% केली आहे.

तसेच या अद्ययावत अंदाजानुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे ९५ आणि ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज होता. हंगामाच्या उत्तरार्धाकरीता नवीन अंदाजात, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतील पाऊस सरासरीच्या १००% राहील असा अंदाज लावण्यात आला आहे. दरम्यान ऑगस्टमध्ये पावसाचा ९९% चा अंदाज आहे. तसेच, असे म्हटले आहे की आतापर्यंत जमा झालेली पावसाची तूट जी ९% आहे ती भरून निघेल.

या हंगामात मान्सूनच्या पावसाला संथ सुरवात झाली होती आणि जून महिना ३३% च्या मोठ्या तुटीसह संपला. त्यानंतर जुलैमध्ये मान्सूनची सक्रिय स्थिती दोन आठवड्यांपेक्षा जास्त राहिली. त्यानुसार, पावसाची कमतरता ९% पर्यंत कमी झाली जी ४२ मि.मी. आहे.

दुसर्‍या टप्प्यातील मान्सूनच्या पूर्वानुमानाचा मतितार्थ खालील गोष्टी सूचित करतो:

* उर्वरित हंगामाकरिता ऑगस्टमध्ये ९९% पावसाच्या अटीसह १००% पावसाचा अंदाज आहे ज्याचा अर्थ सप्टेंबर महिन्यात पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या १०२% असणे आवश्यक आहे.

* हंगामातील उर्वरित दोन महिन्यात केवळ १००% पाऊस पडल्यास ९% ची कमतरता भरून निघणार नाही. या सर्वोत्तम संभाव्य परिस्थितीत देखील पावसाची हंगामी कमतरता ५% राहील ज्याचा अर्थ सामान्यपेक्षा कमी पाऊस असा होतो.

* ९% ची तूट पुनर्संचयित करण्यासाठी, हंगामाच्या उत्तरार्धात दीर्घकालीन सरासरीच्या ११० % पाऊस होणे आवश्यक आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या उत्तरार्धात मान्सूनच्या सद्यस्थितीत मंदी दिसून येईल आणि त्यामुळे पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या १००% पेक्षा जास्त जाणे कठीण आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या प्रमाणावर यंदाचे मान्सूनचे भवितव्य अवलंबून राहील.

Image Credits – The Hindu Business Live

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES