Skymet weather

[Marathi] १९ सप्टेंबरला मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याने स्कायमेटने रेड अॅवलर्ट जारी केला आहे

September 18, 2019 8:50 AM |

Mumbai rains

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरूच आहे. शिवाय, शहरापेक्षा अधिक, उपनगरात काही चांगल्या सरी दिसत आहेत. आजही नवी मुंबईतील बर्यााच भागांत सकाळपासून निरंतर पाऊस पडत आहे.

आता गणपती सप्ताहाच्या जोरदार पावसानंतर मुंबईत १९ आणि २० सप्टेंबरला मुसळधार पाऊस परतण्याची शक्यता आहे.

या आगामी पावसाचे कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती जी लवकरच मध्य महाराष्ट्रात विकसित होईल. प्रत्यक्षात ही प्रणाली कोकण क्षेत्राच्या दिशेने जाईल अशी अपेक्षा आहे. अरबी समुद्रावरील उष्ण वारा पावसाच्या कामात वाढ करण्यात अधिक मदत करेल.

त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस १९ आणि २० सप्टेंबर रोजी म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवारला परतणार. शहराच्या बऱ्याच भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. यामुळे ये-जा करणे देखील अवघड होईल, परिणामी मुंबई शहरात वाहतुकीची कोंडीही होईल. या आगामी मुसळधार पावसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पालघर, वाशी, ठाणे, खारघर, रायगड, नेरूळ, पनवेल, बदलापूर आणि आसपासच्या भागांतही याच काळात जोरदार पाऊस पडेल.

शिवाय, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग येथेही मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

Image Credit: Indian Express

Please Note: Any information picked from here must be attributed to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try